ETV Bharat / entertainment

Raj Kundra on separation : 'विभक्त' होण्याच्या पोस्टनंतर राज कुंद्रानं जाहीर केला आपल्या प्रवासाचा पुढील टप्पा - UT69 चित्रपट रिलीज

Raj Kundra on separation : राज कुंद्रानं त्याच्या नवीन सोशल मीडिया पोस्टमधून शिल्पा शेट्टीसह विभक्त होत असल्याच्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. त्यानं कुण्या व्यक्तीचा नाही तर मास्कचा निरोप घेतल्याचं सांगितलंय. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा आगामी UT69 चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.

Raj Kundra on separation
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 4:48 PM IST

मुंबई - Raj Kundra on separation : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विभक्त होत असल्याची रहस्यमय पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर अनेकांना प्रथमदर्शनी तो आणि शिल्पा शेट्टी विभक्त होताहेत की काय असा संशय आला होता. त्यानं आता नव्या पोस्टमधून सांगितलंय की तो कोणा व्यक्तीपासून दूर जात नाहीय तर मास्कला आपल्यापासून दूर करतोय. पॉर्न व्हिडिओ प्रकरणी तुरुंगाची वारी केल्यानंतर राज कुंद्रा मास्क लावूनच फिरत असे. इतकंच नाही तर गणेश उत्सवातही त्याच्या घरी पापाराझी गेले असता तो स्वतःचा चेहरा झाकून होता. कालच त्यानं विमानतळावर मास्क शिवाय पापाराझींना पहिल्यांदाच पोज दिली होती. त्यानंतर त्यानं ही रहस्यमय पोस्ट लिहून मास्कपासून विभक्त होत असल्याची पोस्ट लिहिलीय.

  • Farewell Masks …it’s time to separate now! Thank you for keeping me protected over the last two years. Onto the next phase of my journey #UT69 🙏🎭🥹 🧿😇❤️ pic.twitter.com/svhiGS8aHt

    — Raj Kundra (@onlyrajkundra) October 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज कुंद्रानं स्पष्ट केलंय की, तो एखाद्या व्यक्तीपासून नव्हे तर त्याच्या मुखवट्यापासून विभक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्याचं संरक्षण केल्याबद्दल त्यानं त्याच्या मास्कबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्याची सुरुवात जाहीर केलीय. राजनं नव्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'मास्कचा निरोप घेतोय...आता वेगळं होण्याची वेळ आली आहे! गेल्या दोन वर्षांपासून मला संरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. मी पुढील टप्प्यावर UT69 चा प्रवास सुरु करतोय.'

  • We have separated and kindly request you to give us time during this difficult period 🙏💔

    — Raj Kundra (@onlyrajkundra) October 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आधीच्या पोस्टमध्ये राज कुंद्रानं केलेलं ट्विट मनोरंजन जगतात खळबळ उडवून देणारं ठरलं होतं. 'आम्ही विभक्त झालो आहोत आणि या खडतर काळामध्ये आम्हाला वेळ द्यावा ही नम्र विनंती...', असं त्यानं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यामुळे त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यात आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टीमध्ये बिनसलंय आणि ते वेगळे झालेत असं वाटलं होतं. पण हे ट्विट केल्यानंतर युजर्सनी त्याच्या कमेंट सेक्शनवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा अंदाज बांधायला सुरुवातही केली होती. अखेर त्यानं दुसरी पोस्ट करुन यावरचा पडदा उचललाय आणि आपण मास्कविषयी हे लिहिल्याचं कळवलंय.

हेही वाचा -

  1. Bigg Boss 17: 'वीकेंड का वार'च्या बिग बॉसमध्ये आधी राडा, नील भट्ट विकी जैन, अंकिता लोखंडे खानजादी एकमेकांशी भिडले

2. Leke Prabhu Ka Naam Teaser: अरिजित सिंगच्या गाण्यावर सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची जबरदस्त झलक

3. Rajinikanth Wishes Ganapath : रजनीकांतनं 'गणपथ'च्या टीमला दिल्या शुभेच्छा, जॅकी श्रॉफनंही मानलं थलैयवाचं आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.