ETV Bharat / entertainment

Aditi Rao breaks silence : सिद्धार्थसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर अदिती राव हैदरीने अखेर सोडले मौन - सिद्धार्थ डेट करत असल्याची चर्चा

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे. अदितीने आता सहकारी अभिनेता सिद्धार्थसोबतच्या नात्याच्या अफवांना उत्तर दिले आहे. ती काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Aditi Rao Hyadri finally breaks silence
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ
author img

By

Published : May 22, 2023, 11:59 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी हिची अलिकडेच स्ट्रीम झैालेली ज्युबिली ही वेब सिरीज चांगलीच गाजली. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केले. पण ती अलिकडे केवळ ज्युबिली मालिकेच्या यशामुळे नाही तर आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे अभिनेता सिद्धार्थसोबत प्रेम प्रकरण चालू असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आजपावेतो यावर दोघांनीही कधीच भाष्य केलेले नाही. मात्र अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना सिद्धार्थसोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर आपले मौन सोडले आहे.

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे डेटिंग - सिद्धार्थ आणि अदिती अनेक वेळा डेटिंग करत असताना आढळून आले आहेत. तरीही त्यांनी आपल्या नात्याबद्दल कधीही दुजोरा दिलेला नाही किंवा नाते नाकारलेही नाही. सिद्धर्थसोबत तिची वाढत असलेल्या जवळीकीबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी ती लाजली आणि हाताने क्रॉसिंग हावभाव केले. नंतर तिने यावर भाष्य करायचे नसल्याचे सांगत ओठांवर झीप केलेले चिन्ह बनवले. त्यामुळे यावर ती स्पष्ट बोललेली नसली तरी या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी सुरू असल्याचे स्पष्ट होते.

महा समुद्रम या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाले प्रेम प्रकरण - गेल्या वर्षभरापासून अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ डेट करत असल्याच्या चर्चा मीडियामध्ये होत आहेत. हे जोडपे त्यांच्या महा समुद्रम या चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून, हे दोघे अविभाज्य झाले आहेत आणि वारंवार एकत्र क्वालिटी टाइम वेळ घालवत असतात. ते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांच्या वाढदिवसासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी एकमेकांना प्रेम आणि आपुलकी दाखवण्यात कधीही चुकत नाहीत.

अदितीची राव हैदरी हिची वर्कफ्रंट - दरम्यान, व्यावसायिक कामाच्या आघाडीवर, अदिती राव हैदरी अलीकडे ताज: डिव्हाइड बाय ब्लड आणि ज्युबिली सारख्या कलाकृतीमध्ये दिसली. या दोन्ही शोला प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. या दोन्ही चित्रपटांतील तिच्या अभिनयासाठी अदितीने प्रचंड प्रशंसा मिळवली.

हेही वाचा - Actress Accident Death : शुटिंगवरून परतताना प्रसिद्ध अभिनेत्रीला ट्रकने चिरडले; जागीच सोडले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.