मुंबई : 'आदिपुरुष' हा वादग्रस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच संघर्ष करत आहे. चित्रपटाला सर्व बाजूंनी विरोध होत असून, २२ जूनला या चित्रपटाच्या प्रदर्शितला एक आठवडा पूर्ण झाला आहे. हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने एका आठवड्यात जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला. निर्मात्यांना चित्रपटाच्या तिकीट दर कमी करूनही या चित्रपटाला कुठलाही फायदा झाला नाही. विशेष म्हणजे हा चित्रपट २२ आणि २३ जून रोजी १५० रुपयांच्या तिकिटांच्या विशेष ऑफर अंतर्गत दाखवला जात आहे. असे असूनही चित्रपट पाहण्यासाठी मोजकेच प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत आहेत.
बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्क डॉट कॉमच्या मते, चित्रपटाने ७व्या दिवशी ५.५ कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये अंदाजे २६०.५५ कोटींची कमाई केली आहे. आदिपुरुषने ४०० कोटी रुपयांचा जागतिक कमाईचा टप्पा ओलांडला आहे. टी-सीरिजने गुरुवारी जाहीर केले की या चित्रपटाने सहा दिवसांत ४१० कोटींची कमाई केली आहे.
कमाईच्या आकड्यात सतत घसरण : दैनंदिन संख्येत सतत होत असलेली घसरण हे दर्शवते की या चित्रपटाला ५०० कोटीची कमाई करायला थोडा वेळ लागेल. ५००-६०० कोटींचे बजेट असलेल्या आदिपुरुषने पहिल्या दिवशी १४० कोटी, त्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येकी १०० कोटींची कमाई करून अवघ्या तीन दिवसांत 340 कोटींची कमाई केली. दरम्यान, सोशल मीडियावर आदिपुरुषमधील संवाद जेव्हा शेअर केल्या गेला तेव्हा या चित्रपटातील कुरूप संवाद ऐकून प्रेक्षक भटकले. त्यामुळे चित्रपटावर बंदी यावी असे सोशल मीडियावर हायलाईट होऊ लागले. आदिपुरुष चित्रपट हा हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित चित्रपट आहे. अनेक समीक्षकांनी पात्रांचे आधुनिकीकरण केल्याचा आरोप केला आहे. बरीच टीका झाल्यानंतर निर्मात्यांनी शेवटी कापडा तेरा बाप का (फॅब्रिक तुमच्या वडिलांचे ) कापडा तेरी लंका का (कपडे तुमच्या लंकेचे ) हा वादग्रस्त संवाद बदलविला आहे.
नेपाळने बंदी रद्द केली : नेपाळच्या एका न्यायालयाने आदिपुरुषसह हिंदी चित्रपटांवरील बंदी गुरुवारी रद्द केली आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले की देशाच्या सेन्सॉर बोर्डाने मंजूर केलेल्या कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालू नये. आदिपुरुषमधील एक संवाद ज्यामध्ये सीतेला 'भारताची मुलगी' असे संबोधले जाते, त्यामुळे काठमांडूचे महापौर बलेंद्र शाह यांनी सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याची घोषणा केली. अनेकांचा असा विश्वास आहे की सीता, जिला जानकी म्हणूनही ओळखले जाते, तिचा जन्म आग्नेय नेपाळमध्ये असलेल्या जनकपूरमध्ये झाला होता.
हेही वाचा :