मुंबई : देशभरात विरोध होत असलेला प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. चित्रपटाचे नाव ऐकताच प्रेक्षक चित्रपटाला शिव्या देत आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की, निर्मात्यांना चित्रपटाच्या तिकिटचे किंमत निम्म्याहून कमी करावे लागले आहे, 150 रुपयांना तिकिट विकून 22 आणि 23 जूनला चित्रपट दाखवण्याचा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आदिपुरुष हा चित्रपट आपला खर्च वसूल करतो की नाही याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 395 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 7 व्या दिवसात आणि 6 दिवसात आदिपुरुषाने किती पैसे जमा केले हे आपण या बातमीमध्ये पाहूया..
सहाव्या दिवशी आदिपुरुषाची कमाई : 22 जून रोजी आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला एक आठवडा पूर्ण करेल. तसेच सध्याला चित्रपट दाखवण्यासाठी 150 रुपयांची तिकिटे प्रेक्षकांना विकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आदिपुरुष निर्मात्यांनी चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई पाहिल्यानंतर त्यांना फार मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने सहाव्या दिवशी केवळ 7.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
जगभरात 400 कोटींचा टप्पा ओलांडला : चित्रपटाची वाटचाल 400 कोटींच्या दिशेने होत असली तरी. या चित्रपटाने 5 दिवसात 395 कोटींचा व्यवसाय केला होता. सहाव्या दिवशी अंदाजे या चित्रपटाने 7.50 कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, आदल्या दिवशी म्हणजे २१ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये ९.४४ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली होती.
चित्रपटामध्ये कुरूप संवाद : ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग, सैफ अली खान आणि देवदत्त नागे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रत्येकजणांला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्या चारित्र्यावरून ट्रोल केल्या जात आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सध्याला चित्रपटाचे बाजारमूल्य घसरले आहे. चित्रपटामधील कुरूप संवादांमुळे ह्या साऱ्या गोष्टी घडत आहे.
हेही वाचा :