मुंबई - अभिनेत्री दिशा पटानी, सोनम बाजवा आणि मौनी रॉय यांचा एक दिलखुलास हसतानाचा एक फोटो सध्या खूपचर्चेत आहे. या तिघीही अक्षय कुमारच्या द एंटरटेनर्ससाठी त्यांच्या जगाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी सहजतेने जबरदस्त आकर्षक ग्रुप पिक्चर पोस्ट करून सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली आहे. सूर्यास्ताच्या वेळी तिन्ही सुंदरी आकर्षक दिसत आहेत. पंजाबी सनसनाटी अभिनेतीत्री सोनम बाजवाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांच्या वर्ल्ड टूरचा पुढच्या स्टॉप, ऑर्लॅंडोचे फोटो पोस्ट केले. 'ऑर्लॅंडो, आम्ही येथे आहोत,' असे तिने फोटोला कॅप्शन दिले आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सोनम बाजवाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले,सकाळची सुरूवात तर जबरदस्त झाली बुवा. तर अनेकजण तिघींच्या सौंदर्यंचे कौतुक करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय कुमारच्या द एंटरटेनर्सची वर्ल्ड टूर - अक्षय कुमार, दिशा पटानी, नोरा फतेही, सोनम बाजवा, मौनी रॉय, जसलीन रॉयल आणि अपारशक्ती खुराना यांचा समावेश असलेला, द एन्टरटेनर्स टूर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आयोजित करण्यात आला आहे. अलीकडेच या शोची कमी तिकीट विक्री झाल्यामुळे शोच्या आयोजकांनी त्यांचा न्यू जर्सीत होणारा शो रद्द केला होता. अधिकृत निवेदनात असे लिहिले होते की, शोची तिकीटे खूप संथ पद्धतीने विक्री होत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे ते परवडणारे नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय कुमार वाहतोय अपयशाची धुरा - बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या चित्रपटांना उतरती कळा लागली आहे. अशात त्यांचा भारतीय स्टार्ससोबत सुरू असलेला जागतिक दौराही फार यश संपादन करताना दिसत नाही. अक्षयच्या चाहत्यांसाठी ही काळजी करायला लावणारी गोष्ट आहे. कामच्या आघाडीवर अक्षय कुमार यानंतर ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपट फ्रँचायझी, हेरा फेरीमध्ये दिसणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत तो पुन्हा एकत्र येणार आहे आणि या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट शुटिंगसाठी फ्लोरवर जाईल.
हेही वाचा - Oscars 2023: ऑस्कर अवॉर्ड्सची तारीख, वेळ ते नामांकित व्यक्तीं आणि चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा