मुंबई - बॉलिवूडची सर्वांग सुंदर अभिनेत्री नुश्रत भरुच्चा 17 मे रोजी तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जन्मलेल्या नुश्रतने मुंबई पर्यंतचा प्रवास खूप संघर्षातून केला आहे. टीव्हीच्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा अभिनयाचा प्रवास जय संतोषी माँ मार्गे रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचलाय.
टीव्ही ते रुपेरी पडदा नुश्रतचा प्रवास - नुश्रतने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकातून केली. किटी पार्टी या झी टीव्हीच्या सिरीयलमध्ये ती पहिल्यांदा झळकली. यात तिची भूमिका दीर्घ काळासाठी नव्हती. यानंतर मात्र तिचा खरा संघर्ष सुरू झाला. आपण उत्तम अभिनय करतोय हे तिने सिद्ध केले होते. कॅमेऱ्याला सामोरे जाणे ही तिच्यासाठी सरावाचे झाले होते. याकाळात ती अनेक ऑडिशन्स देत राहिली आणि अखेरीस तिला जय संतोषी माँ हा चित्रपट मिळाला. या पहिल्या चित्रपटात मिळालेल्या संधीचे सोने तिने केले. त्यानंतर तिच्यासाठी चित्रपटसृष्टीचे दार उघडत राहिले. कल किसने देखा, ताज महल, लव्ह सेक्स धोका अशा चित्रपटातून ती काम करत राहिली. तिच्या करियरला खरे वळण मिळाले ते प्यार का पंचनामा या चित्रपटापासून.
प्यार का पंचनामाने मिळाली लोकप्रियता - नुश्रत भरुच्चाचा प्यार का पंचनामा रिलीज झाला आणि तिची लोकप्रियता तरुणाईत पोहोचली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यात तिने कार्तिक आर्यनच्या मैत्रीणीची भूमिका केली होती. प्यार का पंचनामाने त्याकाळात चित्रपटाचा ट्रेंडच बदलून टाकला आणि नुश्रतचे करियरही.
दिग्दज कलाकारांसोबत नुश्रतच्या भूमिका - प्यार का पंचनामा चित्रपटानंतर तिच्या वाट्याला अनेक भूमिका आल्या. अनेक दिग्गज कलाकारासंह उत्तम निर्माते आणि उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करण्याची संधी नुश्रत भरुच्चाला मिळत राहिली. आकाशवाणी, मेरठिया गँग, प्यार का पंचनामा २, वालेबा राजा, सोनू के टीटू की स्वीटी, सपनें की राणी, मरजावाँ, जय मम्मी दी, छलांग यासारखे चित्रपटा तिच्या वाट्याला आले. अलिकडेच तिने छोरी या हॉरर चित्रपटात काम केले. अनेक जॉनरच्या भूमिका ती लीलया पार पाडते. छोरी हा मराठी चित्रपटाचा रिमेक होता. आता या चित्रपटाचा सीक्वेलमध्येही ती काम करत आहे. मधल्याकाळात राम सेतु या चित्रपटासह सेल्फी, तू झुठी मैं मक्कर, छत्रपती यासारख्या चित्रपटातूनही भूमिका साकारल्या आहेत.