ETV Bharat / entertainment

Actress denied entry into the temple : बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज अभिनेत्री अमला पॉलला मंदिरात प्रवेश नाकरला - Bollywood debut

एर्नाकुलम (केरळ) येथील महादेव मंदिरात दक्षिण चित्रपट अभिनेत्री अमला पॉलला प्रवेश दिला गेला नाही. अमला पॉल ख्रिश्चन असल्यामुळे तिला मंदिरात प्रवेश नाकरला गेला. यावर आता प्रतिक्रिया येत असून अमलाच्या पाठीशी अनेक व्यक्ती आणि संघटना उभ्या राहात आहे

अमला पॉलला मंदिरात प्रवेश नाकरला
अमला पॉलला मंदिरात प्रवेश नाकरला
author img

By

Published : Jan 18, 2023, 4:07 PM IST

एर्नाकुलम : एर्नाकुलम (केरळ) येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात दक्षिण चित्रपट अभिनेत्री अमला पॉलला प्रवेश दिला गेला नाही. तिरुवैरानिकुलम मंदिर व्यवस्थापनाने सांगितले की, मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. अमला पॉल ख्रिश्चन असल्यामुळे तिला मंदिरात प्रवेश दिला जाऊ शकत नाही. अमला पॉलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. मंदिरात एका उत्सवानिमित्त अभिनेत्री देवाच्या दर्शनासाठी आली होती. प्रवेश न मिळाल्याने अभिनेत्रीने मंदिरासमोरील रस्त्यावरून देवाचे दर्शन घेतले आणि मंदिरातून प्रसाद घेऊन परतली. या घटनेबाबत अनेकांनी मंदिर व्यवस्थापनाच्या कारवाईवर टीका केली आहे.

अभिनेत्रीला एका हिंदू नेत्याचा पाठिंबा मिळाला - हिंदू नेते आर.व्ही. बाबूने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीचे समर्थन केले आहे. आपल्या फेसबुकवर पोस्ट शेअर करताना हिंदू नेत्याने लिहिले की, 'अश्रद्धा नसलेल्या हिंदूला मंदिर प्रशासक बनण्याची परवानगी देण्याच्या आणि अहिंदू आस्तिकांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या तर्कावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.'

ते म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाने तिरुपतीसारख्या मंदिरांमध्ये पाळल्या जाणार्‍या चालीरीतींचा विचार केला पाहिजे, जेथे गैर-हिंदूला दर्शन घेण्यापूर्वी देवतेवर विश्वास ठेवण्यास सांगितले जाते. त्याचवेळी, या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले की त्यांनी मंदिरातील सध्याच्या प्रथेचे पालन केले आहे.

अमला पॉलचे बॉलिवूड डेब्यू - अमला पॉल साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने राम चरण आणि अल्लू अर्जुन यांसारख्या साऊथ सुपरस्टारसोबत चित्रपट केले आहेत. आता अमला बॉलीवूडकडे वाटचाल करत आहे. अमला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे आणि ती बॉलिवूड स्टार अजय देवगणच्या आगामी 'भोला' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपट भोला या वर्षी 30 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

'भोला' हा दक्षिण स्टार कार्ती स्टारर सुपरहिट तमिळ चित्रपट 'कैथी' (2019) चा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन स्वतः अजय देवगण करत आहे. कमल हसन स्टारर 'विक्रम'.' आणि थलपती विजयच्या 'मास्टर'चा युवा दिग्दर्शक लोकेश कनकराज याने मूळ कैथी चित्रपट बनवला आहे.

अभिनेत्री अमला पॉल ही मल्याळम अभिनेत्री असून सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. तिची इन्स्टा वॉल अनेक सुंदर फोटोंनी सजलेली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ४६ लाख फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा - Amruta Fadnavis New Reel : अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत, रील स्टार रियाझ अलीसोबत शेअर केला व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.