ETV Bharat / entertainment

Leo Movie : 'लिओ' चित्रपटातील विजयचे 'ना रेड्डी' गाणे वादात अडकले - धुम्रपानची टॅग लाईन

साऊथ सुपरस्टार विजय याचा आगामी लिओ चित्रपटातील नुकतेच पहिले गाणे रिलीज झाले आहे. या चित्रपटातील हे गाणे फार चर्चेत आले आहे. या गाण्यात विजयने 'धूम्रपान' केले आहे, त्यामुळे या गाण्यावर टीका होत आहे.

Leo Movie
लिओ चित्रपट
author img

By

Published : Jun 29, 2023, 11:32 AM IST

मुंबई : साऊथ सुपरस्टार विजय थलापथी याच्या आगामी लिओ चित्रपटातील नुकतेच रिलीज झालेले गाणे 'ना रेड्डी' चर्चेत आले आहे. हे गाणे डान्स किंवा लिरिक्समुळे चर्चेत नाही तर गाण्यामध्ये विजयने धुम्रपान केल्यामुळे चर्चेत आले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि विजयला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे.

'ना रेड्डी' गाणे वादात : दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी वाद लक्षात घेऊन आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर येत आहे. आता 'ना रेड्डी' गाण्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी 'धूम्रपान केल्याने कर्करोग होतो आणि जीव जातो' अशी चेतावणी टॅगलाइन समाविष्ट करून आपली चूक सुधारली आहे. विजयचे धुम्रपान करण्याचे व्हिज्युअल अजूनही व्हिडिओमधून हटवलेले नाहीत.

2000 डान्सर्ससोबत शूट गाणे : विजयच्या वाढदिवशी टीमने 'लिओ'ने चित्रपटातील पहिले गाणे 'ना रेड्डी' रिलीज केले होते. हे गाणे 2000 डान्सर्ससोबत शूट करण्यात आले आहे. 'ना रेडी' गाण्यात धुम्रपान, मद्यपान आणि ड्रग्जच्या व्यसनाला लोक सध्याला विरोध करत आहेत. तसेच या गाण्यात विजयच्या धूम्रपानाच्या दृश्यांचाही समावेश आहे. यामुळे 'ना रेड्डी' या गाण्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. विजयविरोधात कारवाईसाठी चेन्नई महानगर पोलिस आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली होती.

धोक्याची टॅगलाइन जोडली : अशा परिस्थितीत चित्रपटाच्या टीमने विजयच्या स्मोकिंगच्या व्हिज्युअलमध्ये 'धूम्रपानामुळे कॅन्सर होतो, आयुष्य संपते' अशी धोक्याची टॅगलाइन जोडली आहे. गाण्यात हा बदल केल्यावर लोक आता त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याचे बोल बदलले जातील की तसेच राहतील याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'लिओ'चे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात विजय व्यतिरिक्त संजय दत्त, मॅथ्यू थॉमस, मायस्किन, गौतम वासुदेव मेनन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि सँडी हे देखील दिसणार आहे. लिओ हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तमिळ व्यतिरिक्त, हा चित्रपट तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषांसह डब केलेल्या आवृत्त्यांमध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Lust stories season 2 : बॉलिवूड अभिनेत्री काजलने केले स्त्री सुखावर वक्तव्य
  2. Kangana Ranaut : बॉलिवूड क्वीन पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला...
  3. Rajkummar Rao : राजकुमार राव साकारणार शहीद भगतसिंगची भूमिका...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.