मुंबई - Randeep hooda : अभिनेता रणदीप हुड्डा त्यांच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. त्यांच्या लग्नाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर शनिवारी त्यानं एक पोस्ट शेअर करून याबद्दल पुष्टी दिली आहे. रणदीप 29 नोव्हेंबरला त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. रणदीप हुड्डानं या पोस्टद्वारे लग्नाच्या तारखेपासून तर लग्नाचे ठिकाण आणि रिसेप्शनपर्यंतची माहिती त्यानं दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, 'आमच्याकडे रोमांचक बातमी आहे.' त्यानं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण त्याला याबद्दल शुभेच्छा देत आहेत.
चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : रणदीप हुडानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहलं की, 'महाभारतात जसे अर्जुनने मणिपूरची योद्धा राजकुमारी चित्रांगदासोबत लग्न केले होते. घरच्यांच्या आशीर्वादानं आम्हीही लग्न करणार आहोत. पोस्टमध्ये त्यानं पुढं लिहलं, 'आमचे लग्न 29 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील इंफाळ येथे होणार आहे. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन होईल. या नव्या प्रवासात पुढे जात असताना आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे'. त्यानं शेअर केलेल्यावर पोस्टवर त्याच्या एका चाहत्यानं शुभेच्छा देत लिहलं, 'अभिनंदन आणि शुभेच्छा' त्यानंतर दुसऱ्या एकानं लिहलं, ' तुझ्या लग्नाच्या फोटोची मी वाट पाहत आहे, अभिनंदन' याशिवाय आणखी एकानं लिहलं, 'अभिनंदन भावा'. या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम : रणदीप हुडा आणि लिन लैश्राम लग्नाआधी लंच डेटवर दिसले होते. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचे विधी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी सुरू होतील आणि रात्रीपर्यंत चालतील. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम लग्नात मणिपूरचे पारंपरिक कपडे परिधान करणार आहेत. या लग्नात मणिपुरी लोकगीते आणि पारंपारिक खाद्यपदार्थांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. रणदीप हुड्डा आणि लिनच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. यानंतर मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी होईल. लिन लैश्राम रणदीप हुड्डापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.
हेही वाचा :