ETV Bharat / entertainment

38 krishna villa : मनोरंजनसृष्टीत ३८ वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. गिरीश ओक यांचे ५० वे नाटयपुष्प, ‘38 कृष्ण व्हिला’! - 38 कृष्ण व्हिला

गिरीश ओक 38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे दिसणार आहेत. डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे.

38 krishna villa
38 krishna villa
author img

By

Published : Apr 3, 2022, 3:08 PM IST

मुंबई : नुकतीच महाराष्ट्र शासनाने चित्रपट-नाट्यगृहांत १००% उपस्थितीची परवानगी दिली. त्यामुळे नाट्यकर्मी खुश असून जोमाने कामाला लागले आहेत. कोरोना महामारीच्या कालखंडात अडकलेली अनेक नाटकं आता प्रयोगांसाठी सज्ज होत आहेत. मराठी नाटक-विश्वात डॉ गिरीश ओक अनेक वर्षे कार्यरत आहेत. यावर्षी ते नाट्यसृष्टीत ३८ वर्षे पूर्ण करीत असून त्यांचे नवीन नाटक येऊ घातले आहे ज्याचे नाव आहे, ‘38 कृष्ण व्हिला’. तसेच रंगभूमीवरील त्यांचे हे ५० वे नाटयपुष्प असेल.

38 krishna villa
38 कृष्ण व्हिला
करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर वैविध्यपूर्ण विषयांवरील नवीन अनेक नाटकं येऊ घातली आहेत. नाटकाचा विषय कोणताही असो, विनोदी, गंभीर, सस्पेन्स, आपल्या अनोख्या शैलीत ते नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांचा हातखंडा आहे अशा दिग्दर्शकांमध्ये विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ‘38 कृष्ण व्हिला’ हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर येत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे दिसणार आहेत. डॉ. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प आहे. या त्रिवेणी संगमामुळे ‘38 कृष्ण व्हिला’ हे नाटक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची दर्जेदार मेजवानी असणार यात शंका नाही.

38 कृष्ण व्हिला
‘ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख’? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भितार्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा....’ गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. ‘38 कृष्ण व्हिला’ नाटकामध्ये डॉ. गिरीश ओक देवदत्त कामत या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत ह्या प्रथितयश व्यक्तीवर नंदिनी चित्रे, ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते आणि त्यांच्यापुढे उभे राहते एक नवे आव्हान, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे. 38, कृष्ण व्हिला ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला, सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव. रहस्यमय पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे.
हेही वाचा - MI Vasantrao : नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत ‘मी वसंतराव' चे ट्रेलर प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.