मुंबई Aamir khan And Junaid khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं लाल सिंग चड्ढा या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर आमिर खान अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतोय. बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्स 2023 आणि 2024 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं करिअर सुरू करणार आहेत. खुशी कपूरपासून तर सुहाना खानपर्यंत अनेक नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळतील. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. लवकरच आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. जुनैदच्या बॉलीवूड पदार्पणाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तो आता साऊथ अभिनेत्री साई पल्लवीसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. सध्या याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. साऊथमधील अनेक कलाकर हे हिंदी चित्रपटांमध्ये दिसत आहेत.
जुनैद खान दिसणार साई पल्लवीसोबत : साई पल्लवी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. जुनैद खानच्या दुसऱ्या चित्रपटातून साई पल्लवीचा बॉलिवूड चित्रपटसृष्टीत डेब्यू होऊ शकतो. हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी लवकरच दोघेही वर्कशॉप सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे. जुनैद खान यशराज बॅनरच्या 'महाराजा' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. जुनैदचा दुसरा चित्रपट 'लव्ह टुडे' या तमिळ भाषेतील हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. जुनैद आमिर खान प्रॉडक्शन निर्मित 'प्रीतम प्यारे' या वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
जुनैदनं अमेरिकेत थिएटरचं प्रशिक्षण घेतल : जुनैदनं अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स, लॉस एंजेलिसमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानं दोन वर्षांपासून अमेरिकेत थिएटरचं प्रशिक्षण घेतलं आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं त्याच्या मुलाच्या डेब्यूबद्दल चर्चा यापूर्वी केली होती. आमिरनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याच्या मुलाला इंडस्ट्रीत यायचं की नाही, हा पूर्णपणे त्याचा स्वतःचा निर्णय आहे. मला त्याच्यासाठी कोणताही निर्णय घ्यायचा नाही.
हेही वाचा :
- Tiger shroff and janhvi kapoor : टायगर श्रॉफ आणि जान्हवी कपूर झळकणार दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'रेम्बो' चित्रपटात...
- Manik Bhide passed away : किशोरी आमोणकर यांच्या शिष्या माणिक भिडे यांना देवाज्ञा!
- Vijay Thalapathy Film Leo : साऊथ सुपरस्टार विजय थलपथीचा 'लिओ' चित्रपट यूकेमध्ये अनकट होईल रिलीज...