ETV Bharat / entertainment

Ira Khan pre-wedding ceremony : आमिर खानची मुलगी आयरा खाननं प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो केले शेअर - आयरा खाननं फोटो आणि व्हिडिओ केला पोस्ट

Ira Khan pre-wedding ceremony : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान आता काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आयरा खान आणि नुपूर शिखरे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

Ira Khan pre-wedding ceremony
आयरा खान प्री- वेडिंग सेरेमनी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 2:25 PM IST

मुंबई - Ira Khan pre-wedding ceremony : हिंदी चित्रपटसृष्टीतला 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या तिच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचा आनंद घेत आहे. आयराचे आणि नुपूर शिखरेचे प्री- वेडिंगमधील काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती लवकरच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्यानं साखरपूडा केला होता. त्यानंतर या दोघांच्या लग्नाची वाट अनेकजण पाहत आहे. आयरानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर मंगळवारी काही फोटो शेअर केले आहेत. तिनं कॅप्शनमध्ये तिच्या चाहत्यांना सांगितले, 'केळवण 2, उखाणा 2, मी यावर खूप प्रेम करते.' फोटोंमध्ये हे जोडपं एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.

आयरा खाननं फोटो आणि व्हिडिओ केला पोस्ट : फोटोमध्ये तिनं मराठी पारंपारिक लूक ठेवला आहे. ती लाल रंगाचं पातळ नेसलीय. चेहऱ्यावर लाईट मेकअप केला आहे. याशिवाय आयरानं गळ्यात फुलांची माळ घातली आहे. केसाचा बन बांधून तिनं यावर गजरा माळला आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. याशिवाय नुपूरनं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. या फोटोंमध्ये आयरा तिच्या होणाऱ्या पतीसोबत पोझ देताना दिसत आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. यापूर्वी प्री- वेडिंग सेरेमनीमध्ये दोन्ही कुटुंब एकत्र उपस्थित होते.

आमिर खाननं तारखेबद्दल दिली माहिती : मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खाननं मुलगी आयरा खानच्या लग्नाच्या तारखेबाबत मोठा खुलासा केला होता. आमिरच्या म्हणण्यानुसार, आयरा आणि नुपूर शिखरे पुढील वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला लग्न करणार आहेत. 8 ते 9 जानेवारी या कालावधीत या जोडप्याच्या लग्नाचे कार्यक्रम उदयपूरमध्ये आयोजित केले जाणार आहे. लग्नाआधी आयरा आणि नुपूर कोर्ट मॅरेज करणार आहेत. आयरा आणि नुपूरनं 2020 मध्ये डेटिंग सुरू केली आणि 2021 मध्ये त्यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला.

हेही वाचा :

  1. Janhvi Kapoor and Shikhar Pahariya : जान्हवी कपूरला शिखर पहारियानं म्हटलं, 'मी पूर्णपणे तुझा आहे'
  2. Swara Bhasker Diwali : दिवाळीच्या आठवणीत रमली स्वरा भास्कर, शेअर केली उत्सवाची झलक
  3. Ankita Lokhande Trolled : 'बिग बॉस 17'मध्ये सुशांत सिंगबद्दल बोलताना अंकिता लोखंडे झाली भावूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.