मुंबई Aamir khan : बॉलीवूड अभिनेता आमिर खानने सध्या त्याच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालविण्यासाठी कामातून सुट्टी घेतली आहे. अनेकदा आमिर हा आपल्या तीन मुलांसोबत स्पॉट होत असतो. त्यांची मुले जुनैद खान, इरा खान आणि आझाद राव खान हे देखील खूप चर्चेत असतात. दरम्यान आता आमिर खानबाबत एक बातमी समोर आली आहे. आमिर बुधवारी रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाला. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओमध्ये तो चाहत्यांशी शेकहॅन्ड करून संवाद साधताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या या व्हिडिओचं अनेकजण कौतुक करत आहे.
आमिर खानचं लूक : आमिरनं रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाहेर उभे राहून पोझ दिली. यावेळी तो कॅज्युअल लूकमध्ये होता. त्यानं हलका निळा पट्टे असलेला पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. याशिवाय त्यानं काळ्या लेदरच्या सँडल घालतली होती. यावर त्यानं चष्मा घातला होता. तसेच आमिरची हेअर स्टाईल ही खूप स्टाईलिश होती.
चाहत्यानं केलं कौतुक : सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. आमिरचं कौतुक करत एकानं लिहलं , आमिरनं भारतीय चित्रपटसृष्टीतील काही सर्वोत्तम चित्रपट दिले. दुसर्यानं या पोस्टवर कमेंट करत लिहलं, 'द्वेष करणारे द्वेष करतील पण तो मिस्टर परफेक्शन आहे. आणखी एकानं लिहलं, 'मला आमिर खानचे चित्रपट आवडतात'. काहीजणांनी या पोस्टवर लाल हार्ट इमोजीसह फायर पोस्ट केलं आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.
आमिर खान झाला ट्रोल : काहीजण आमिर ट्रोल देखील करत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एकानं लिहलं, 'हा आज 3 इडियट्स चित्रपटामधला व्हायरस दिसत आहे.' दुसऱ्या एकानं लिहलं, चित्रपट जर हिट करायचा असेल तर चांगला राहावं लागते ना त्याला 'लाल सिंग चड्ढाची आठवण येत असेल. अशा देखील कमेंट या पोस्टवर येत आहेत.
वर्कफ्रंट : आमिर खान शेवटचा करीना कपूर खानसोबत अद्वैत चंदनच्या 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसला होता. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, त्यानं आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजसाठी ख्रिसमस 2024 ची तारीख लॉक केली आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये फ्लोरवर जाणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाविषयी अधिक माहिती समोर यायची आहे. या चित्रपटाचे शीर्षक देखील ठरायचे आहे.
हेही वाचा :