ETV Bharat / entertainment

Aamir daughter Ira Khan wedding: मुलीच्या लग्नात भावनिक होणार आमिर खान, कुटुंबीयांना सातवतेय चिंता - इरा खान आणि नुपूर शिखरे विवाह

Aamir daughter Ira Khan wedding: आमिर खाननं आपली मुलगी इरा खानच्या लग्नाची तारीख निश्चित केली आहे. होणारा जावई नुपूर शिखरेचं कौतुक करत आपल्या मुलीनं तिच्यासाठी योग्य वर शोधल्याचा अभिमानही यानिमित्तानं आमिरनं व्यक्त केलाय. तो खूप भावनिक असल्यामुळं मुलीच्या लग्नात रडेल, याची चिंता त्याच्या कुटुंबीयांना वाटत आहे.

Aamir daughter Ira Khan wedding
आमिर खानची मुलगी इराचा विवाह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 3:59 PM IST

मुंबई - Aamir daughter Ira Khan wedding: हिंदी सिनेसृष्टीचा सुपरस्टार आमिर खानने अखेरीस आपली मुलगी इरा खानच्या लग्नाचा मूहुर्त निश्चित केला आहे. हा दिवस त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप खास आणि आव्हानात्मक असणार आहे. पुढील वर्षी हा विवाह पार पडणार असल्याचं आमिर खाननं एका चर्चे दरम्यान सांगितलंय. त्यानं होणारा आपला जावई नुपूर शिखरेचं खूप कौतुक केलंय. आमिर खानची मुलगी इरा हिच्या नैराश्येच्या काळात नुपूरनं तिची खूप काळजी घेतल्याचं तो म्हणाला.

एका न्यूज माध्यामाच्या संवादात आमिरने सांगितलं की, त्याच्या मुलीचे लग्न पुढच्या वर्षी ३ जानेवारीला नुपूर शिखरेशी पार पडेल. मुलगी इरानं तिच्यासाठी योग्य जीवनसाथी शोधल्याचं समाधान त्यानं बोलून दाखवलं आणि नुपूर शिखरेवर कौतुकाचा वर्षावही केला. आमिरनं सांगितलं की नुपूर ही खरोखरच अशी व्यक्ती आहे जिने इराला भावनिक मदत केली. त्यानं निराशेच्या गर्तेत गेली असताना तिला सावरलं आणि तिच्या पाठीशी तो ठामपणे उभं राहिला.

अभिनेता आमिर खान पुढे म्हणाला, 'हा फिल्मी डायलॉग वाटेल पण नुपूर मला मुलासारखा वाटतो.' आमिरने पुढे त्याचे कौतुक केले आणि म्हटले की नुपूर इतका छान मुलगा आहे की तो खरोखरच कुटुंबाचा एक भाग असल्याचं त्याला वाटतंय. आमिर खूप भाविनक असल्यामुळे इराच्या लग्नात तो खूप रडेल अशी चिंता त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहे.

इरा आणि नुपूर यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी एका छोटेखानी कौटुंबीक सोहळ्यात साखरपुडा केला होता. यावेळी त्याचे फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. भाचा इम्रान खान, आमिरच्या माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव आणि अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्यासह खान कुटुंबातील सदस्यांनी या एंगेजमेंट सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. आमिरच्या मुलीचा विवाह सोहळा धुमधडाक्यात साजरा होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु या विवाहाचा थाट मुंबईत घातला जातोय की डेस्टीनेशन वेडिंग म्हणून हा सोहळा मुंबई बाहेर पार पडतोय हे कळायला अजून अवधी आहे.

हेही वाचा -

  1. Nushrratt Bharuccha : युद्धग्रस्त इस्रायलमधून परतल्यानंतर नुसरत भरुचानं पहिला व्हिडिओ केला शेअर ; भारत सरकारचे मानले आभार...

2. Tiger 3 Trailer Release Date : 'टायगर 3' च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली, पोस्टरसह रिलीज तारखेची झाली घोषणा...

3. Amitabh Bachchan Birthday : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या 'टॉप पाच' चित्रपटाबद्दल जाणून घ्या....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.