नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता आमिर खान ( Aamir Khan ) सध्या त्याच्या आगामी फॅमिली एन्टरटेनर लाल सिंग चड्ढाच्या ( entertainer Laal Singh Chaddha. ) प्रमोशनमध्ये गुंतला आहे. अलीकडील मीडिया संवादादरम्यान, आमिरने खुलासा केला की त्याच्या चित्रपटामुळे त्याला गेल्या 48 तासांपासून झोप येत नाही.
आमिर म्हणाला, "मी सध्या खूप चिंताग्रस्त आहे, 48 तास झाले आहेत मी झोपलो नाही. मी विनोद करत नाही, खरंच मला झोप येत नाही. माझा मेंदू ओव्हरड्राइव्हमध्ये आहे, म्हणून मी पुस्तके वाचतो किंवा ऑनलाइन बुद्धिबळ खेळतो. 11 ऑगस्टनंतरच झोप येईल."
11 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो काय करणार आहे, असे विचारल्यावर आमिर म्हणाला, “मी शेवटी 11 तारखेनंतर झोपेन, मला वाटते की मी आणि अद्वैत ('लाल सिंग चढ्ढा'चे दिग्दर्शक) शांतपणे झोपू आणि मग जेव्हा आम्ही जागे होऊ तेव्हा प्रेक्षक आपल्याला चित्रपट आवडला की नाही हे सांगतील. जागे होऊन त्याचा शोध घेऊ."
आमिरने चाहत्यांकडून प्रामाणिक प्रतिक्रिया मिळवण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल सांगितले आणि म्हणाला, "चित्रपटावर प्रेक्षकांच्या अस्सल प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी वेगवेगळ्या थिएटरमध्ये फिरतो. मी हॉलमध्ये उपस्थित आहे हे प्रेक्षकांना माहित नसते. पहिल्या आठवड्यात, प्रोजेक्शन खिडकीतून किंवा बाजूच्या दारातून प्रेक्षकांची खरी प्रतिक्रिया मिळविण्यासाठी मी वेगवेगळ्या शहरांना आणि वेगवेगळ्या थिएटर्सना भेट देतो."
या चित्रपटाचा निर्माता असलेला आमिर पुढे म्हणाला, "लपण्यासाठी जागा कोणती चांगली हे त्या थिएटरवरच अवलंबून असते. अशा प्रकारे मी प्रेक्षकांच्या खऱ्याखुऱ्या प्रितिक्रिया मिळवतो. मी तिथे हजर आहे हे प्रेक्षकांना कळले तर त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतात. परंतु मला नैसर्गिक प्रतिसाद अनुभवायचा असतो."
अद्वैत चंदन दिग्दर्शित, लाल सिंग चड्ढा हा चित्रपट अकादमी पुरस्कार विजेत्या 'फॉरेस्ट गंप' या 1994 च्या चित्रपटाचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे ज्यात टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.
हेही वाचा - Koffee With Karan 7: सोनम कपूरचा अर्जुनबद्दल सनसनाटी खुलासा, पाहा व्हिडिओ