ETV Bharat / entertainment

स्पॅनिश चित्रपट 'कॅम्पिओन्स'च्या रिमेकमध्ये पडद्यामागे राहणार आमिर खान - Aamir Khan in Champions movie

‘चॅम्पियन्स’ या चित्रपटात आमिर खान भूमिका करणार किंवा नाही याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र स्वतः आमिरनेच याविषयावर पडदा टाकला आहे. तो या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

आमिर खान
आमिर खान
author img

By

Published : Nov 15, 2022, 10:59 AM IST

मुंबई - आमिर खानच्या ‘चॅम्पियन्स’ या आगामी प्रोजेक्टच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच "लाल सिंग चड्ढा" मध्ये दिसलेला अभिनेता त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत आला होता. यावेळी त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल भाष्य केले.

‘चॅम्पियन्स’ या चित्रपटात आमिर खान भूमिका करणार किंवा नाही याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र स्वतः आमिरनेच याविषयावर पडदा टाकला आहे. तो म्हणाला, "ही एक अप्रतिम स्क्रिप्ट आहे, ही एक सुंदर कथा आहे, आणि हा एक अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे. पण मला वाटते की मला ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत रहायचे आहे," असे आमिर म्हणाला.

त्याच्या या बोलण्यावरुन स्पष्ट होते की तो आता अभिनय करण्याच्या मुडमध्ये नाही. परंतु त्याला स्क्रिप्ट आवडली आहे व चित्रपटाची निर्मिती तो करणार आहे. याबद्दल तो म्हणाला, "मी 'चॅम्पियन्स'ची निर्मिती करणार आहे कारण माझा चित्रपटावर विश्वास आहे, मला वाटते की ही एक उत्तम कथा आहे." असे म्हणत आमिरने चित्रपटाची निर्मिती करत असल्याबद्दलचा खुलासा केला.

आमिर खान प्रॉडक्शनसह सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन, इंडिया आणि 200 नॉटआउट प्रॉडक्शनसह या चित्रपटाची सह-निर्मिती करणार आहेत.

हेही वाचा - एकाच वर्षात महेश बाबूच्या आई, भाऊ आणि वडीलांचा मृत्यू, टॉलिवूडवर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.