ETV Bharat / entertainment

Aalay Mazya Rashila : राज ठाकरे यांच्याहस्ते 'आलंय माझ्या राशीला'चे पोस्टरचे अनावरण

author img

By

Published : Jan 27, 2023, 3:54 PM IST

ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींचा आणि मानवी भावभावनांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे या विविध राशींच्या व्यक्तिरेखांना अभ्यासणे हेसुद्धा खूपच मनोरंजक आहे. या विषयाला धरून बरेच चित्रपट येऊन गेले. आता त्या यादीत अजून एका चित्रपटाची भर पडतेय ती म्हणजे आगामी मराठी चित्रपट 'आलंय माझ्या राशीला'. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आले.

Aalay Mazya Rashila
राज ठाकरे यांच्याहस्ते 'आलंय माझ्या राशीला'चे पोस्टर अनावरित!

मुंबई : प्रत्येक मनुष्याला भविष्याबद्दल कुतूहल असते. त्यामुळे जवळपास सर्वचजण वर्तमानपत्रातील राशिभविष्य वाचत असतात. त्याने काही घडो वा ना घडो पण राशिभविष्य वाचण्याची मजा काही औरच असते. आपल्या राशीचक्रातल्या बारा राशी या अतिशय मनोरंजक आहेत. आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केले आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या वेगळ्या विषयाचे कौतुक करीत राज ठाकरे यांनी चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री निर्मिती सावंत, निर्माते आनंद पिंपळकर, सहनिर्माते दिलीप जाधव, युवा अभिनेता प्रणव पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे उपस्थित होते.

प्रमुख भूमिका : 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत. युवा अभिनेता अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय.

सौंदर्याची गंमत : थोड्यादिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला. अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल. सौंदर्याची गंमत दाखवणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केले आहे.

१० फेब्रुवारीला चित्रपटगृहात : 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केले आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत. गीते गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांचे आहे. वेशभूषा मैत्रीयी शेखर आणि संगीता तिवारी यांची आहे. ध्वनी अशोक झुरुंगे तर नृत्य सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रितम पाटील यांचे आहे. साहसदृश्ये अकबर शरीफ तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी सांभाळली आहे. 'आलंय माझ्या राशीला' हा मराठी चित्रपट येत्या १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : पठाणच्या यशावर कंगना राणावतची ट्विटरवर प्रतिक्रिया; लिहले 'गूंजेगा तो यहाँ सिर्फ जय श्रीराम'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.