मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. आदिपुरुष रिलीज झाल्याच्या दिवसापासून प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. याचे कारण म्हणजे त्याचे खराब संवाद आणि व्हिएफएक्स, ज्यामुळे चित्रपटाला अनेक वादांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही परिणाम झाला आहे.
आदिपुरुषला दोन आठवडे पूर्ण : या सगळ्यामध्ये आदिपुरुषला चित्रपटगृहात दोन आठवडे पूर्ण झाले आहेत आणि आता हा चित्रपट जास्त काळ बॉक्स ऑफिसवर टिकणार नाही असे दिसते आहे. ५०० कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. दुसरीकडे, जर आपण या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोललो तर, हा चित्रपट अजूनही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा गाठण्यासाठी धडपडत करत आहे. 30 जून रोजी आदिपुरुषने एकूण 282.33 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिसवर होत आहे कमी कमाई : 'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित चित्रपट आहे, प्रभास स्टारर चित्रपट देशभरात थ्रीडी (3D) मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या 'टपोरी' संवाद, खराब व्हीएफएक्समुळे प्रेक्षक फार चिडले होते. या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना देखील फार शिव्या प्रेक्षकांनी दिल्या होत्या. भारतात या चित्रपटावर बंदी यावी असे अनेक भागामधून मागणी झाली होती. तसेच या चित्रपटावर भारतातच नाही तर नेपाळमध्ये देखील टीका करण्यात आली होती. आदिपुरुष या चित्रपटावर नेपाळमध्ये बंदी लावण्यात आली होती मात्र काही दिवसांनी यावर बंदी हटवण्यात आली. हा चित्रपट तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू, हिंदी, इंग्रजीमध्ये रिलीज झाला आहे, मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाही आहे. या चित्रपटात प्रभासने राघवची भूमिका, क्रिती सेनॉनने जानकीची तर सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. याशिवाय सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली असून देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :