मुंबई - गेल्या वर्षी जून 2022 मध्ये राजस्थानच्या उदयपूर शहरामध्ये एका टेलरसोबत एक अतिशय भयानक घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेत दोन जणांनी कन्हैया लाल नावाच्या शिंपीचा शिरच्छेद करून खून केला. या भीषण घटनेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. या दुर्घटनेच्या एका वर्षानंतर म्हणजेच 28 जून 2023 रोजी या घटनेवर आझधारित चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट कन्हैया हत्याकांडावर आधारित आहे. भरत सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे शीर्षक ए टेलर मर्डर स्टोरी असे ठेवण्यात आले आहे. आता या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली असून चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे.
अंगावर शहारे आणणारा टीझर - हा टीझर बघायला खूप भितीदायक आहे, या टीझरमध्ये त्या घटनेचे खरे दृश्य दाखवण्यात आलेले नसले तरी हा टीझर त्या दुर्दैवी सत्यघटनेची आठवण करून देतो, ज्यामुळे पायाखालची जमीन सरकते. दरम्यान, कन्हैया लालच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर उदयपूर महानगरपालिकेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने पोहोचून रक्तदान केले. इतकेच नाही तर चित्रपटाची टीम मुंबईहून आली होती. सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी कन्हैया लाल यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर रक्तदानही केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
चित्रपट कधी प्रदर्शित होणार? - 'ए टेलर मर्डर स्टोरी' हा चित्रपट जानी फायर फॉक्स प्रायव्हेट लिमिटेड बनवत आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी टीम उदयपूरमध्ये दाखल झाली आहे. कन्हैया लालचा मोठा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाशी चर्चा केली आहे आणि भविष्यातही ही चर्चा सुरूच राहणार असल्याचे चित्रपट निर्माते जानी यांनी सांगितले. सध्या या चित्रपटाचा टीझर आला असून येत्या ऑक्टोबर महिन्यात ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
काय होतं संपूर्ण प्रकरण? - या प्रकरणाचा उगम काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीतून झाला आहे. यानंतर भाजप सदस्या (तोपर्यंत) नुपूर शर्मा यांनी पैगंबरावर वादग्रस्त विधान करून मुस्लिमांना भडकवले होते आणि त्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. विशेष म्हणजे कन्हैया लालच्या फेसबुक आयडीवरून पैगंबर बद्दलचा वादग्रस्त व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. याबद्दलची त्याच्या मुलालाही माहिती नव्हती, परंतु या व्हिडिओमुळे दोन मुस्लिम ग्राहक म्हणून कन्हैया लालच्या दुकानात आले. कन्हैया या दोन मुस्लिमांचे कपडे बनवण्यासाठी मोजमाप घेत होता, त्याचवेळी दोघांनीही कन्हैयाचे डोके धारदार शस्त्राने कापून शरीरापासून वेगळे केले. या घटनेनंतर संपूर्ण देशात हाहाकार माजला होता.
हेही वाचा -
२. Adipurush Box Office Collection : आदिपुरुष या चित्रपटाची कमाई धोक्यात