ETV Bharat / entertainment

कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलावर आधारित पाच मराठी चित्रपट

Kartik Ekadashi : कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलावर आधारित पाच मराठी चित्रपटांबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही हे चित्रपट कार्तिक एकादशीच्या निमित्तानं पाहू शकता.

Kartik Ekadashi
कार्तिक एकादशी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 5:54 PM IST

मुंबई - Kartik Ekadashi : संपूर्ण भारतामध्ये, प्रत्येकजण विविध देव आणि धर्माला पुजतात. महाराष्ट्रात आध्यात्मिक राजधानी पंढरपूर आहे आणि तिथे विठ्ठलाची पूजा केली जाते. वारकरी समुदाय पायी दिंडी घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. एकादशीला विठ्ठलाच्या भक्तीतीत तल्लीन होऊन वारकरी उत्तम आध्यात्मिक भावनेचं प्रदर्शन करतात. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाची स्तुती करणाऱ्या काही मराठी चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.

'संत गोरा कुंभार' चित्रपट : राजेश लिमकर दिग्दर्शित 'संत गोरा कुंभार' या चित्रपटात मंगेश दिवांज, मानसी लोणकर, नितीन महाडिक आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कहाणी संत गोरा कुंभार यांच्यावर आधारित आहे. संत गोरा कुंभार हे वारकरी समुदायातील असून ते व्यवसायानं कुंभार होते. ते विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन अभंग लिहित असत. त्यांनी विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन चिखल तुडवताना बालकाला तुडवल्याची कथा सर्वश्रुत आहे.

'हरी ओम विठ्ठला चित्रपट : 'हरी ओम विठ्ठला या भक्तीपटाचं दिग्दर्शन साद दळवी यांनी केलं. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, जयंत सावरकर, अमिता खोपकर हे कलाकार आहेत. हा चित्रपट विठ्ठलाचा भक्त असलेल्या गन्याच्या जीवनावर आधारित आहे. गन्या जेव्हा जीवनातील संकटांमध्ये अडकतो, तेव्हा तो देवाकडे उपाय विचारतो. त्यानंतर त्याला प्रत्यक्ष परमेश्वर उत्तर देतो. जेव्हा तो हे सर्व गावातील लोकांना सांगतो की मला देवानं दर्शन दिले, तेव्हा त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. अनेकजण त्याला वेड्यात काढतात. या सर्व गोष्टी सहन न झाल्यानं तो मुंबईला जातो आणि एका गायन स्पर्धेत लाखो रुपये जिंकतो आणि जेव्हा तो गावी परततो. हा चित्रपट खूप मनोरंजक आहे.

'विठ्ठल विठ्ठल' चित्रपट : गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'विठ्ठल विठ्ठल' चित्रपटामध्ये मिलिंद गवळी, वृंदा गजेंद्र, मिताली जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहे. या कहाणीत 4 भिन्न पात्रे उलगडली आहेत, जी त्यांच्या स्वत:च्या वेगळ्या हेतूनं वारीमध्ये सामील होतात. एक शास्त्रज्ञ आहे, ज्याला पांडुरंगाला विचारायचे आहे की, त्याच्या मुलाचा मृत्यू का झाला. दुसरीकडे एक स्त्री तिच्या वडिलांच्या शोधात आहे. हा चित्रपट या 4 पात्रावर आधारित आहे.

'भक्त पुंडलिक' चित्रपट : 'भक्त पुंडलिक' हा चित्रपट विठ्ठलाचे परमभक्त महान संत पुंडलिक यांचा जीवनवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांनी केलं आहे. 'भक्त पुंडलिक'मध्ये यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, सरला येवलेकर, सरोज सुखटणकर, लता कर्नाटकी, हीरा चव्हाण आणि इतर कलाकार आहेत. पुंडलिक हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक होते. हा चित्रपट त्याची जीवनकहाणी उलगडतो.

'लय भारी' चित्रपट : 'लय भारी' या चित्रपटातून रितेश देशमुखचे मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण झाले. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. श्रीमती निंबाळकर मातृत्व प्राप्त करण्यासाठी विठ्ठलाकडे नवस मागते, की जर ती आई झाली तर ती तिचं पहिलं मूल विठ्ठलाला अर्पण करणार. त्यानंतर तिला मुलगा होतो. ती आपला शब्द पाळते आणि विठ्ठलाच्या चरणी आपलं मूल अर्पण करते. त्यानंतर तिला देवाच्या आशीर्वादानं दुसरा मुलगा होते. तिच्या पतीला आणि मुलाला कुटुंबातील लोक कट रचून मारतात. त्यानंतर ती पंढरपूरला येते. मग तिला माऊली दिसतो. माऊला तिचाचं मुलगा असतो, जो तिनं पांडुरंगाला समर्पित केलेला असतो. याबरोबरच इतरही अनेक चित्रपट पंढरपूर, पांडूरंग आणि वारीला वाहिलेले आहेत. त्याचा आस्वाद वारीच्या निमित्ताने आपण घेऊ शकता.

हेही वाचा :

  1. एका सीनसाठी शाहरुखनं 25 वेळा केली रिहर्सल, 'डंकी'साठी किंग खानची मेहनत
  2. 'अ‍ॅनिमल'मधील भूमिकेचं अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंगशी साम्य असल्याचं रणबीर कपूरनं केलं कबुल
  3. बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं पती विकी जैनला मारली चप्पल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.