मुंबई - 12th Fail Day 1 Box Office Collection: हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता विक्रांत मॅसी आणि पलक लालवानी स्टारर चित्रपट 'ट्वेवल्थ फेल' (12th Fail) ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती 25 कोटीमध्ये झाली आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'ट्वेवल्थ फेल' चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. या चित्रपटाला आयएमडीबी ( IMDb) वर 10 पैकी 9 रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाची कहाणी आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या संघर्षावर आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी विक्रांत मॅसीच्या 'ट्वेवल्थ फेल'चे ट्रेलर सोशल मीडियावर खूप पसंत केले गेले होते. 'ट्वेवल्थ फेल' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कंगना रणौतच्या तेजसला मात दिली आहे. तेजसची पहिल्या दिवशीची कमाई 1.25 कोटी इतकी झालीय. तुलनेत कमी बेजटमध्ये बनलेल्या 'ट्वेवल्थ फेल' नं तेजसला चांगली टक्कर दिलीय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'ट्वेल्थ फेल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार '12ट्वेवल्थ फेल'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.10 कोटीची कमाई केली. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा चित्रपट 1.75 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 2.85 कोटी होईल. या चित्रपटाला हिंदी चित्रपटांमध्ये थिएटरमध्ये 9 टक्के व्याप मिळत आहे. दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये या चित्रपटाला सर्वाधिक व्यवसाय मिळत आहे. '12ट्वेवल्थ फेल'मध्ये विक्रांत मॅसीची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हा चित्रपट स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. हा चित्रपट कंगना राणौतच्या 'तेजस' चित्रपटासोबत प्रदर्शित झाला आहे, मात्र' तेजस'च्या तुलनेत या चित्रपटाला पसंती मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर आणखी वेगानं कमाई : माउथ पब्लिसिटीमुळे कमाईचा वेग वाढेल असं सध्या दिसत आहे. या चित्रपटाविषयी बोलताना विक्रांतनं एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'चित्रपट केवळ हिंदी भाषेवर आधारित नाही, तर हा चित्रपट मुख्यत्वे आयुष्य पुन्हा सुरू करण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षावर आहे. सामान्य समाज असा आहे की, जर कोणी त्याच्या शालेय शिक्षणात नापास झाले तर ,तो आयुष्यातही नापास होईल असं समजातात मात्र , मला हे मान्य नाही. होय, शिक्षण हे चांगल्या जीवनाचे प्रवेशद्वार आहे, परंतु केवळ शैक्षणिक यश हे यश नाही. आपण अयशस्वी झाल्यास आपण पुन्हा प्रारंभ करू शकता आणि आपले स्वप्न साध्य करू शकता.
हेही वाचा :