मुंबई - ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ शनिवारी मुंबईतील एका खासगी विमानतळावर दिसला. अभिनेता पांढरा टी-शर्ट आणि पँट परिधान केलेला दिसत होता, त्यासोबत त्याने काळी शॉर्ट्स देखील परिधान केली होती. गेल्या महिन्यात अभिनेत्याने ऑस्करच्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला थप्पड मारली होती. ऑस्करच्या वादानंतर तो पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या पाहायला मिळत आहे.
विमानतळावर त्याचे चाहते आणि माध्यमांना पाहून सुपरस्टारने हस्तांदोलन केले आणि फोटो क्लिक करण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे स्वागत केले. त्याच्यासोबतच्या व्यक्तीने साधू परिधान करीत असलेले भगवे कपडे परिधान केले होते. स्मिथची भारत दौऱ्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्या फेसबुक वॉच मालिकेचा एक भाग म्हणून त्याने 2019 मध्ये हरिद्वारला भेट दिली होती आणि त्याने मुंबईत 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मध्ये कॅमिओसाठी शूट केले होते.
विशेष म्हणजे ऑस्कर थप्पड वादाच्या घटनेनंतर स्मिथ हेडलाईन्सपासून दूर राहिला. ख्रिस रॉकने 2022 ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचा पुरस्कार देताना स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या मुंडण केलेल्या डोक्याची खिल्ली उडवली. घटनेच्या काही मिनिटांनंतर, स्मिथला 94 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले होते. "किंग रिचर्ड" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (मुख्य भूमिका) ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना अकादमी आणि इतरांची त्याने आपल्या कृतीबद्दल माफी मागितली होती. तथापि, दुसऱ्या दिवशी स्मिथने त्याच्या वर्तनाबद्दल त्याच्या सोशल मीडिया हँडलवर ख्रिस रॉक आणि अकादमीची माफी मागितली होती.
हेही वाचा - Will Smith apologizes: विल स्मिथचा माफीनामा : ''मी मर्यादा ओलांडली आणि मी चूक होतो''