ETV Bharat / entertainment

Cannes 2022 : ज्युरी सदस्यांसोबत दीपिकाचा डिनर व्हिडिओ व्हायरलl - Superstar Deepika Padukone

कान्समध्ये दीपिका पदुकोणच्या पहिल्या अधिकृत उपस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हॉटेल मार्टिनेझ, कान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्युरी डिनरच्या प्रसंगाचे हे व्हायरल फोटो आणि व्हिडिओ आहे.

कान्समध्ये दीपिका पदुकोण
कान्समध्ये दीपिका पदुकोण
author img

By

Published : May 17, 2022, 9:55 AM IST

कान्स (फ्रान्स) - बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पदुकोण या वर्षी प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचा भाग होण्यासाठी ज्युरी सदस्यांपैकी एक म्हणून कान्समध्ये पोहोचली आहे. कान्स ज्युरी सदस्य म्हणून दीपिकाचा पहिलाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपिकाने सोमवारी कान्स 2022 मध्ये ज्युरी सदस्य म्हणून तिची पहिली अधिकृत उपस्थिती दर्शवली. हॉटेल मार्टिनेझ, कान्स येथे ज्युरी सदस्यांसाठी आयोजित डिनरमध्ये अभिनेत्री उपस्थित होती. दीपिकाचे ज्युरी सदस्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याआधी सोमवारी, दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर कान्समध्ये तिच्या आगमनानंतर तिच्या चाहत्यांशी झालेल्या संवादाची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. व्हिडिओ क्लिपमध्ये, दीपिकाला डेनिम क्रॉप्ड जॅकेटमध्ये दिसत असून ती चाहत्यांशी अतिशय अनौपचारिक पध्दतीने वागताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या कान्सच्या प्रवासाची झलक स्टाईलमध्ये दाखवण्यात आली आहे. दीपिकाने शेअर केले की तिच्या 11 तासांच्या फ्लाइट प्रवासात ती बहुतेक झोपली होती.

व्हिडिओच्या शेवटी दीपिका खाणे किंवा झोपणे यावर तिचा निर्णय टॉस करताना दिसत आहे आणि अभिनेत्री खाण्याची निवड करते. ती म्हणाली, "खाणे हा नेहमीच चांगला प्लॅन असतो.''

दरम्यान, कामाच्या आघाडीवर दीपिका पॅन इंडिया चित्रपट 'प्रोजेक्ट के' मध्ये सामील झाली आहे. या चित्रपटाचा भव्य सेट रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे. सायन्स फिक्शन असलेल्या प्रोजेक्ट के हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

हेही वाचा - Farah Khan In Shirdi : साई बाबांकडे काय मागितले? फराह खानने मिश्किल उत्तर देत म्हटले, मी बाबांकडे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.