ETV Bharat / entertainment

अँजेलिना जोलीसोबत विभक्त झाल्यानंतर ब्रॅड पिटने 'दुःखा'मधून शोधला आनंद - ब्रॅड पिट लेटेस्ट न्यूज

ब्रॅड पिटने अँजेलिना जोलीसोबत विभक्त झाल्यानंतर 'दुःखा'मधून 'आनंद' शोधल्याबद्दलचा खुलासा केला. 2016 मध्ये विभक्त झाल्यानंतर पिट आणि जोली अजूनही कायदेशीर लढाईत अडकले आहेत. अभिनेत्रीने अलीकडेच ब्रॅड पीटवर विमान प्रवासात तिच्यावर व तिच्या मुलांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र त्याने तो पेटाळून लावला आहेअभिनेत्रीने अलीकडेच ब्रॅड पीटवर विमान प्रवासात तिच्यावर व तिच्या मुलांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र त्याने तो पेटाळून लावला आहे

ब्रॅड पिट अँजेलिना जोलीसोबत विभक्त
ब्रॅड पिट अँजेलिना जोलीसोबत विभक्त
author img

By

Published : Oct 14, 2022, 1:39 PM IST

लॉस एंजेलिस - हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट याने अभिनेत्री अँजेलिना जोलीपासून विभक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर "दुःख" सहन करत कला निर्माण केल्याचा खुलासा केला आहे. ब्रॅड पिटने सांगितले की या कठीण प्रसंगानंतर तो गायक निक केव्ह आणि ब्रिटीश कलाकार थॉमस हाउसागो या दोन मित्रांच्या संपर्कात आला. या सर्वांनी आपल्या आयुष्यात वैयक्तिक लढाया सहन केल्या होत्या.

58 वर्षीय अभिनेता ब्रॅड पीट म्हणाला, "आमचे परस्पर दुःख मजेचा विषय बनले. आणि या दुःखातून माझ्या आयुष्यात आनंदाची ज्योत आली. मला नेहमीच शिल्पकार व्हायचे होते; मला नेहमीच प्रयत्न करायचे होते." ब्रॅड पीटने थॉमसच्या होम आर्ट स्टुडिओमध्ये आपले मन रमवण्याचा प्रयत्न केला. इथे तो त्याच्या आणि निकच्या संयुक्त प्रदर्शनासह, सारा हिल्डन आर्ट म्युझियम, फिनलँड येथे गेल्या महिन्यात WE डेब्यू करत असलेल्या कलेबद्दलची त्याची उत्कट आवड शोधू शकला.

अभिनेत्याने त्याच्या शिल्पाविषयी सांगितले: "मी माझे स्वतःचे जीवन पाहत होतो आणि खरोखरच माझ्या नातेसंबंधातील अपयशांमध्ये मी कुठे सहभागी होतो, मी कुठे चुकलो याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.''

2016 मध्ये विभक्त झाल्यानंतर पिट आणि जोली अजूनही कायदेशीर लढाईत अडकले आहेत, अभिनेत्रीने अलीकडेच ब्रॅड पीटवर विमान प्रवासात तिच्यावर व तिच्या मुलांवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. मात्र त्याने तो पेटाळून लावला आहे. सध्या त्याचे नाव मॉडेल एमिली रताजकोव्स्कीशी जोडले जात आहे.

तो म्हणाला, "लोक काहीही करोत, मी ठीक आहे. मला येथे सुरक्षित वाटते कारण मी माणूस म्हणून आपल्या संघर्षांवर लक्ष केंद्रित केले आहे, कारण ते संकटांनी आणि आनंदानेही भरलेले आहे. मला वाटते की माझ्या अनुभवानिशी वेदना आणि आनंदासह मला सुंदर चालायचे आहे."

हेही वाचा - करवा चौथ निमित्ताने हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचा फोटो केला शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.