ETV Bharat / entertainment

Ali Fazal in Hollywood : अली फजल हॉलिवूड चित्रपट कंदाहारसाठी सज्ज, दाखवला राकट आणि रांगडा लूक - भिनेता अली अतिशय राकड आणि रांगडा

अली फजलने त्याच्या आगामी हॉलिवूड अ‍ॅक्शन चित्रपट कंदाहारमधील स्क्रिन शॉट शेअर केला आहे. वाळवंटाच्या मध्यभागी कॅमेरापासून दूर दिसत असताना अभिनेता अली अतिशय राकड आणि रांगडा दिसत आहे.

Ali Fazal in Hollywood
: अली फजल हॉलिवूड चित्रपट कंदाहारसाठी सज्ज
author img

By

Published : May 18, 2023, 3:46 PM IST

मुंबई - अभिनेता अली फजलने बुधवारी त्याच्या आगामी हॉलिवूड अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट कंदहारच्या फर्स्ट लूक पोस्टरचे लॉन्चिंग केले. इन्स्टाग्रामवर अलीने चित्रपटातील स्वतःचे पहिले-पहिले पोस्टर चाहत्यांना भेट दिले. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये अली वाळवंटाच्या मध्यभागी एका डर्ट बाईकसमोर अगदी रांगड्या लूकमध्ये दिसत आहे. अली हॉलिवूडमधील सर्वात मोठा अॅक्शन स्टार जेरार्ड बटलरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 26 मे रोजी अमेरिकेत रिलीज होणार आहे. सौदी अरेबियाच्या अल उला भागात या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करण्यात आले आहे.

अली फझलची हॉलिवूड एन्ट्री - अली फझल हा पहिला भारतीय अभिनेता आहे ज्याने 2017 च्या व्हिक्टोरिया आणि अब्दुल या दिग्गज डेम जुडी डेंचसह हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. अभिनेता अली आता दिग्दर्शक रिक रोमन वॉच्या अ‍ॅक्शन चित्रपटातील एक लीड म्हणून काम करत आहे. रिक रोमन वॉ यांना एंजेल हॅज फॉलन आणि ग्रीनलँड या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे. रिक रोमन वॉ दिग्दर्शित, कंदहार चित्रपटात लोकप्रिय स्कॉटिश अभिनेता गेरार्ड बटलर, नवीद नेगाहबान, ट्रॅव्हिस फिमेल आणि एलनाझ नोरोझी प्रमुख भूमिकेत आहेत.

कंदहारचे कथानक - हा चित्रपट 26 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या कथानकाबाबत असे सांगण्यात येते की, टॉम हॅरिस (जेरार्ड बटलर), एक गुप्त CIA ऑपरेटिव्ह, अफगाणिस्तानमधील प्रतिकूल प्रदेशात बिकट परिस्थितीत अडकला आहे. त्याचे मिशन उघड झाल्यानंतर त्याला अफगाणी दुभाषीसह कंदाहारमधील एका एक्स्ट्रक्शन पॉईंटपर्यंत बाहेर पडण्याचा यातून लढून मार्ग काढायचा आहे. यासाठी त्याला वरचढ शत्रू आणि त्याची हत्या करण्यास टपलेल्यांना टाळत सुखरुप बाहेर पडायचे आहे.

दरम्यान, अली फजल वेब सीरिज 'मिर्झापूर सीझन 3' मध्ये देखील दिसणार आहे. हा शो अमेझॉन प्राईम या ओटीटीवर स्ट्रीम होईल. त्याशिवाय तो द अंडरबग, गर्ल्स बी गर्ल्स, मेट्रो इन दिनो आणि आणखी एका हॉलिवूड चित्रपट अफगाण ड्रीमर्समध्येही दिसणार आहे.

हेही वाचा - A Key Schedule Of Pushpa 2: पुष्पाने केलेल्या अपमानचा बदला घेण्यासाठी फहद फसिलने केले शुटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.