ETV Bharat / elections

निलेशच्या केसालाही धक्का लागला तर.....विरोधकांना नारायण राणेंचा इशारा

नारायण राणे म्हणाले की, काही लोक निलेशच्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्या लोकांना माझे सांगणे आहे, की निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका.

नारायण राणे
author img

By

Published : Apr 13, 2019, 8:26 AM IST

Updated : Apr 13, 2019, 10:58 AM IST

रत्नागिरी - निलेशच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा, असा थेट इशारा नारायण राणे यांनी विरोधकांना दिला. निलेश राणेंच्या प्रचारसभेत ते जाकादेवी येथे बोलत होते. राणे म्हणाले की, तो प्रामाणिकपणे काम करतोय. खासदार नसला तरी गेली ५ वर्षे तो रत्नागिरीत कार्यरत आहे.

रत्नागिरीच्या सभेत बोलताना नारायण राणे

नारायण राणे म्हणाले की, काही लोक निलेशच्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्या लोकांना माझे सांगणे आहे, की निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका. त्याच्या वडिलांचे नाव नारायण राणे आहे. त्यामुळे त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा.

दरम्यान, हातखंबा - रत्नागिरी मार्गावर झालेल्या गाडी तपासणीच्या वेळी वाद झाला होता. त्यामुळे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर रत्नागिरीचे राजकीय वातारवण चांगलेच तापले होते. राणे म्हणाले, की पोलिसांनी कायद्याचे राज्य जरुर दाखवावे. पण, पक्षपात करू नये. आम्ही नियम तोडत नाही. नियम करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे कोणी कायदा शिकविण्याचा प्रयत्न करू नये.

Intro:निलेशच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी काय होईल याचा अंदाज करा --

नारायण राणे यांचा विरोधकांना इशारा

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिनान पक्षाचेे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ जाकादेवी इथं घेण्यात आलेल्या सभेत खासदार नारायण राणे यांनी विरोधकांना थेट व्यासपिठावरुन इशारा दिला.. काही लोकं निलेशच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.. पण त्यांना मी या व्यासपीठावरून सांगू इच्छितो निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका, निलेशच्या वडिलांचं नाव नारायण राणे आहे, निलेशच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी काय होईल याचा अंदाज करा.. तो प्रामाणिकपणे काम करतोय, खासदार जरी नसला तरी गेली 5 वर्ष तो रत्नागिरीत कार्यरत आहे.
दरम्यान हातखंबा-रत्नागिरी मार्गावर झालेल्या गाड्या तपासणीच्या वेळी झालेल्या वादामुळे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.. यानंतर रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.. याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की पोलिसांनी कायद्याचं राज्य दाखवावं, अन्याय करू नये, पक्षपात करू नये. आम्ही नियम तोडत नाही, नियम कारणाऱयांपैकी आहोत.. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे कोणी कायदाही शिकवण्याचा प्रयत्न करू नये असं राणे यावेळी म्हणाले..

Byte --- नारायण राणे, खासदार, आणि अध्यक्ष , महाराष्ट्र स्वाभिमान पक्षBody:निलेशच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी काय होईल याचा अंदाज करा --

नारायण राणे यांचा विरोधकांना इशारा
Conclusion:निलेशच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी काय होईल याचा अंदाज करा --

नारायण राणे यांचा विरोधकांना इशारा
Last Updated : Apr 13, 2019, 10:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.