सातारा - सोशल मीडियाचा वापर आज अतिशय प्रभावीपणे केला जातो. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हेही यात मागे नाहीत. लोकसभा निडणुकीच्या प्रचारासाठी उदयनराजेंचे सोशल मीडिया अकाऊंट्स प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. विशेष म्हणजे उदयनराजे भोसले स्वतः अॅन्ड्रॉईड फोन वापरत नाहीत.
उमेदवारी जाहीर झाल्यापासून उदयनराजे भोसले यांची सोशल मीडिया प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. प्रचाराचे काम साताऱ्यातील दोन वॉररुममधून चालते. त्यांच्या नावाने फेसबुक, व्हॉट्सअॅप सारखे सोशल मीडिया अकाऊंट्स त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चालवले जातात. लाखोच्या घरात त्यांचे फॉलोअर्स आहेत.
भोसलेंच्या दोन वॉररुमचे काम २४ तास चालते. यात १९ कर्मचारी तीन टप्प्यात प्रचाराचे काम करतात. प्रचारासाठी सोशल नेटवर्किंग मीडिया, न्यूज मीडिया सेंटर, डिझाईनिंग, परमिशन सेंटर, व्हेईकल, डिस्ट्रिब्यूशन सेंटर असे विभाग तयार करण्यात आले आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप पेजवर दिवसाला चार पोस्ट टाकल्या जातात. या पोस्ट नंतर व्हायरल केल्या जातात. उदयनराजे भोसले यांच्या फेसबुक पेजला ८ लाख फॉलोअर्स आहेत.