पुणे - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवद साधत आहेत. यापूर्वी त्यांनी पुण्यातील आघाडीतील उमेदवारांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे, पार्थ पवार, मोहन जोशी, अमोल कोल्हे यांनीही राहुल गांधींची भेट घेतली आहे. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांची वर्धा येथे जाहीर सभा आहे. गुरुवारी त्यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे जनसभेला संबोधीत केले होते.
लोकसभा निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्व पक्ष संपूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात ७ लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे. त्यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ - वाशिम या लोकसभा मतदार संघासाचा समावेश आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी यासाठी महाराष्ट्रात कमर कसलेली आहे. नागपूरमध्ये सभा घेतल्तेयानंतर आज त्यांचा दौरा पुणे आणि वर्ध्यामध्ये आहे. येथे ते मतदारांशी संवाद साधतील. नागपूर येथील प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला होता. त्यामध्ये त्यांनी सत्तेत आल्यानंतर चौकीदाराची चौकशी करणार आणि त्यांना तुरुंगात टाकणार, असे म्हटले होते. त्यांतर आता त्यांच्या आज होणाऱ्या सभांवर देशाचे लक्ष लागून राहणार आहे.