अहमदनगर - मतदारसंघात वातावरण चांगले आहे. मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल. माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समजून घ्या बाजी कोण मारणार, असे युतीचे उमेदवार सुजय विखे म्हणाले.
विखे यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. ते म्हणाले, की मला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. युतीच्या नेत्यांकडून सुद्धा मला खूप मदत झाली. दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र सकाळपासून माझ्यासोबत आहेत. सर्व आमदारही प्रामाणिकपणे काम करत आहेत , असे विखे म्हणाले. पाणी हा मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न आहे. मी पाण्यासाठी काम करणार आहे, असे विखेंनी सांगितले.