ETV Bharat / elections

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अखेर शिवसेनेची बाजी.. विनायक राऊत यांची निलेश राणेंवर मात

रत्नागिरी - सिंधुदुर्ग - निलेश राणे पुनरागमन करणार की राऊत खासदार म्हणून पुन्हा जिंकणार याचा कौल अखेर लागला आहे. शिवसेनेचे विनायक राऊत येथून विजयी झाले असून निलेश राणेंच्या पदरी पुन्हा पराभव आला आहे

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील निवडणूक तिरंगी
author img

By

Published : May 23, 2019, 5:59 AM IST

Updated : May 23, 2019, 7:42 PM IST

३.३० या मतदार संघातील मतमोजणी संपली असून निलेश राणेंच्या पदरी पुन्हा पराभव आला आहे. शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

१.०० - शिवसेनेचे विनायक राऊत दहाव्या फेरी अखेर ७८३५५ मतांनी आघाडीवर

१२.३० - विनायकराव राऊत यांनी ७० हजार मतांची आघाडी घेतली आहे.

११.४० - शिवसेनेचे विनायकराव राऊत ५५, ००० मतांनी आघाडीवर

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे विनायक राऊत २४२१५ मतांनी आघाडीवर

चिपळूण - विनायक राऊत ३०३५, निलेश राणे १३६६,
रत्नागिरी - विनायक राऊत ४५९० निलेश राणे १०९५
राजापूर - विनायक राऊत २८७१ निलेश राणे ११५६
कणकवली - विनायक राऊत २१२९ निलेश राणे २४०१
कुडाळ - विनायक राऊत २१०४ निलेश राणे २५३२
सावंतवाडी - विनायक राऊत ३३११ निलेश राणे २१९९
एकूण - विनायक राऊत १८०४० निलेश राणे १०७४९
तिसऱ्या फेरीत विनायक राऊत एकूण ७२९१ मतांनी आघाडीवर
*तिसऱ्या फेरी अखेर विनायक राऊत एकूण २४२१५ मतांनी आघाडीवर*

१०.१५ - तिसऱ्या फेरी अखेर शिवसेनेचे विनायकराव राऊत २४, २१५ मतांनी आघाडीवर

९.५० - दुसरी फेरी - निलेश राणे १११९३, विनायक राऊत २१२८६

९.३५ - शिवसेनेचे विनायकराव राऊत १६,९२४ मतांनी आघाडीवर

९.१५ - शिवसेनेचे विनायकराव राऊत आघाडीवर

८.३० - शिवसेनेचे विनायकराव राऊत आघाडीवर

रत्नागिरी सिंधूदर्ग लोकसभा मतदार संघात मतमोजणीला सुरुवात

दरम्यान या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कोण निवडून येणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सर्वच उमेदवार निवडून येण्याचा दावा करत असले तरी, मतदारराजाने या सवांर्चे राजकीय भविष्य इव्हीएममध्ये बंदीस्त केल्याने व त्याचा फैसला मतमोजणीनंतर घोषीत होणार आहे. असे असले तरी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून स्वाभिमानचे निलेश राणे की शिवसेना-भाजप युतीचे विनायक राऊत बाजी मारतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर रायगड मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते हा गड कायम राखतात, की राष्ट्रवादीचे तटकरे तो आपल्याकडे खेचून घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, संपूर्ण मतदारसंघातील अनेक मतदारांनी आपल्या पक्षाऐवजी अन्य पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने, निकाल धक्कादायक लागण्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून संसदेकडे जाणारा यशाचा मार्ग अत्यंत खडतर आहे. या मतदारसंघाने गेल्या १६ निवडणुकांमध्ये कोणाचीही पाठराखण केलेली नाही. त्यामुळेच यावेळी मतदार कोणाच्या पाठीशी उभा राहणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नवीनचंद्र बांदिवडेकर व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे व माजी खासदार निलेश राणे या दिग्गजांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निवडणुकीदरम्यान होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात आघाडीचे बांदिवडेकर यांच्या प्रचाराचा जोर ओसरू लागला आणि ते लढतीतून मागे पडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे युतीचे राऊत व स्वाभिमानचे राणे या दोन मातब्बरांमध्ये आणि ५ वर्षांपूर्वीच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये अटीतटीची लढत झाल्याने, निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात असले तरी राऊत यांचा निवडून येण्याचा विश्वास आणि राणे यांचा आत्मविश्वास याबाबतचा फैसला आज होणार आहे. काँग्रेस आघाडीची हजारो मते अन्य उमेदवाराकडे वळवण्यात आल्याच्या चर्चेमुळे 'चमत्कार' होऊन निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचा निकाल ३ वाजेपर्यत लागण्याची शक्यता आहे..

८.०० - प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात
७.४५ - उमेद्वारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल
७.३० - मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल जामर कार्यान्वित
७.०० - मतमोजणी अधिकारी व कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल. तयारी पूर्ण

रत्नागिरी - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. नविनचंद्र बांदिवडेकर हे जरी नवखे असले तरी काँग्रेसचे पारंपारिक मतदार ही त्यांची जमेची बाजू आहे. जिंकण्याचे अनेक दावे प्रतिस्पर्ध्यांनी केले आहेत. या मतदारसंघातून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. थोड्याच वेळात येथील मतमोजणीला सुरूवात होत आहे.

२०१४ च्या निवडणुकीमध्ये युतीचे विनायक राऊत जवळपास दीड लाख मतांनी निवडून आले होते. त्यावेळी निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. यावेळी मात्र, निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यात शिवसेना-भाजपचे मनोमिलन झाले असले, तरी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते कितपत मदत करतील याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे शिवसेनेला आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण १४ लाख ४१ हजार ९३६ मतदार आहेत. यावेळी एकूण ८ लाख ९७ हजार २४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ६५.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

या मतदारसंघात युतीची ताकद जास्त असली तरी नारायण राणेंनी मुलगा निलेश राणेंसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर भाजपचे मतदार शिवसेनेला कितपत मदत करणार हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे जनता पुन्हा विनायक राऊत यानांच खासदार करणार की निलेश राणेंना दिल्लीला पाठवणार याचा आज निकाल लागणार आहे.

Intro:Body:

ENT 02

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.