ETV Bharat / elections

नारायण राणेंची पुढची वाटचाल कशी असेल, काय आहेत त्यांच्या पुढील पर्याय? - narayan rane letest news

सिंधुदूर्गमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील देवगड मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. तर मालवण कुडाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले त्यांचे पुत्र निलेश राणे इच्छूक आहेत. घरातच दोन उमेदवार असल्याने राणेंचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्यालाही संधी मिळालीच पाहीजे अशी त्यांची भूमिका आहे. तीच राणेंची सध्याची मोठे डोकेदुखी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हानही राणेंसमोर आहे.

नारायण राणेंची पुढची वाटचाल कशी असेल....काय आहेत त्यांच्या पुढील पर्याय ?
author img

By

Published : Sep 17, 2019, 4:40 PM IST

मुंबई- राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. भाजप प्रवेशाची ते वाट पहात आहेत. त्यांचा प्रवेश हा शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे या आधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत नक्की करायचे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

शिवसेना भाजप युती होवू नये अशी नारायण राणेंची इच्छा आहे. तसे झाल्यास राणेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपनेही राणेंना थांबा आणि वाट पहा, असा निरोप दिला आहे. त्यांच्याकडे सध्यातरी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र, भविष्यात काय होईल याचा विचार न करता राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मार्फतच निवडणुकीची तयारी करत आहे. राणे यांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ताकद आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. त्यातही मालवण आणि देवगड मतदारसंघात त्यांच्या बाजूने वातावरण आहे. सावंतवाडीमध्ये मात्र गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांचे तगडे आव्हान त्यांच्या पुढे आहे.

राज्याचे नेतृत्व केलेले राणे सध्या सिंधुदूर्ग पुरतेच मर्यादीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत:च्या पक्षाकडून निवडणूक लढवतानाही त्यांना मर्यादा येणार आहे. तसे झालेच तर ते सिंधुदूर्ग वगळता इतर उमेदवार उभे करण्याचे धाडस करणार नाहीत. तसे केले तरी त्याला मिळाणारा प्रतिसाद किती असेल, या बाबत साशंकता आहे. याची पूर्ण जाणीव राजकारणात कसलेल्या राणेंना आहे.

सिंधुदूर्गमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील देवगड मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. तर मालवण कुडाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले त्यांचे पुत्र निलेश राणे इच्छूक आहे. घरातच दोन उमेदवार असल्याने राणेंचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्यालाही संधी मिळालीच पाहीजे अशी त्यांची भूमिका आहे. तीच राणेंची सध्याची मोठे डोकेदुखी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हानही राणेंसमोर आहे.

नारायण राणे यांनीच स्वत: निवडणूक लढावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. शिवाय दिल्ली पेक्षा राज्याच्याच राजकारणात सक्रिय राहण्यात राणे यांनाही रस आहे. त्यामुळे ऐनवेळी ते मालवण मतदार संघातून पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजप शिवाय लढल्यास मुंबईसह कोकणातून ५ ते १० आमदार निवडून आणण्याचे लक्ष राणेंसमोर आहे. तसं झाल्यास निवडणुकी नंतर राणेंचे राजकीय वजन वाढणार यात काही दुमत नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेला निलेश राणेंचा पराभव नारायण राणेंच्या जिव्हारी लागला आहे. त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना पराभूत करून करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Intro:Body:

नारायण राणेंची पुढची वाचाल कशी असेल....काय आहेत त्यांच्या पुढील पर्याय ? 

मुंबई- राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. भाजप प्रवेशाची ते वाट पहात आहेत. त्यांचा प्रवेश हा शिवसेनेवर अवलंबून असल्याचे या आधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणे यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत नक्की करायचे काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे.  

शिवसेना भाजप युती होवू नये अशी इच्छा नारायण राणेंची आहे. जर युती झाली नाही तर राणेंचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपनेही राणेंना थांबा आणि पहा असा निरोप दिला आहे. त्यामुळे थांबा आणि पहा या शिवाय त्यांच्याकडे सध्या तरी पर्याय नाही . मात्र भविष्यात काय होईल याचा विचार न करता  राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मार्फतच निवडणूकीची तयारी करत आहे. राणे यांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ताकद आहे. त्यांना मानणार एक मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे.  त्यातही मालवण आणि देवगड मतदारसंघात त्यांच्या बाजूने वातावरण आहे. सावंतवाडीमध्ये मात्र गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांचे तगडे आव्हान त्यांच्या पुढे आहे.

राज्याचे नेतृत्व केलेले राणे सध्या सिंधुदूर्ग पुरता मर्यादीत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत: च्या पक्षाक़डून निवडणूक लढवतानाही त्यांना मर्यादा येणार आहे. तसे झाले तर ते सिंधुदूर्ग वगळता इतर उमेदवार उभे करण्याचे धाडस करणार नाहीत. तसे केले तरी त्याला मिळाणार प्रतिसाद किती असेल या बाबत प्रश्नचिन्ह आहे. याची पूर्ण जाणीव राजकारणात कसलेल्या राणेंना आहे. 

सिंधुदूर्गमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील देवगड मतदारसंघात विद्यामान आमदार नितेश राणे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. तर मालवण कुडाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले त्यांचे पुत्र निलेश राणे इच्छूक आहे. घरामध्ये दोन उमेदवार असल्याने राणेंचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्यालाही संधी मिळाली पाहीजे ही त्यांची भूमिका आहे. तीच राणेंची सध्याच मोठे डोकेदुखी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हानही राणेंसमोर आहे. 

नारायण राणे यांनीच स्वत: निवडणूक लढावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. शिवाय दिल्ली पेक्षा राज्याच्याच राजकारणात सक्रिय राहण्यात राणे यांनाही रस आहे. त्यामुळे ऐन वेळी ते मालवण मतदार संघातून पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजप शिवाय राणे लढले तर मुंबईसह कोकणातून ५ ते १० आमदार निवडून आणण्याचे लक्षही राणें समोर ठेवले आहे. तसं झाल्यास निवडणुकी नंतर राणेंचे वजन आपोआप वाढणार आहे.  

लोकसभा निवडणुकीत झालेला निलेश राणे यांचा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना पराभूत करून करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.