वर्धा - चक्क नालीत भाजी धुवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ ( Video Viral ) समोर आला असून या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी ( Hinganghat Police ) गुन्हा दाखल केला आहे. हिंगणघाट शहरातील मनसे चौकातील नालीच्या पाण्यात भाजी धुवत असल्याचा व्हिडिओ ( Washing vegetables Video Viral ) आहे. एका नागरिकाने हे चित्र कॅमेरात टिपून सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. शहरात संतप्त भावना उठल्यावर प्रशासनाने दखल घेतली आहे. या पद्धतीने लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्तीचा शोध हिंगणघाट पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणघाट शहरात हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ निर्माण झाली. लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या भाजी विक्रेत्याच्या विरोधात नगर पालिकेचे प्रशासक सतीश मिसाळ यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी सुद्धा व्हिडिओत ( Video ) दिसणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला. हा युवक शहरातील डांगरी भागात राहणार असून शुभम टामटे असे या तरुणाचे नाव आहे.
हा प्रकार मागील कित्येक दिवसांपासून सुरू होता. याबद्दल आता तर्क- वितर्क लावले जात आहेत. एका जागरूक व्यक्तीने व्हिडिओ काढून ही घटना समोर आणली आहे. हा व्हिडिओ नेमका कोण काढला हे अजून समोर आले नाही. पण या घटनेमुळे व्हिडिओ काढणार्या व्यक्तीचे कौतुक होत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अश्या पद्धतीने लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर मात्र वचाक बसणार आहे, यात काही शंका नाही.
हेही वाचा - Maharashtra Legislature Monsoon Session: पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले, कारण गुलदस्त्यात