ETV Bharat / crime

Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाइन्समध्ये अटक, महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात.. २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

गँगस्टर रवी पुजारीचा (Gangster Ravi Pujari) भाऊ कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या असून, त्याला मुंबईत (Gangster Suresh Pujari) आणण्यात आले आहे. त्याच्यावर ठाणे, नवी मुंबईसह (Thane Navi Mumbai Extortion Cases) विविध ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. फिलिपाइन्समध्ये त्याला अटक करण्यात आली (Arrested In Philippines) असून, भारतात प्रत्यार्पण करून बेड्या ठोकत त्याला मुंबईत आणण्यात आले.

Suresh Pujari
गँगस्टर सुरेश पुजारी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात
author img

By

Published : Dec 15, 2021, 10:01 AM IST

Updated : Dec 15, 2021, 5:36 PM IST

मुंबई : गँगस्टर रवी पुजारीचा (Gangster Ravi Pujari) भाऊ गँगस्टर सुरेश पुजारी याला बेड्या ठोकून मुंबईत (Gangster Suresh Pujari) आणण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएसने त्याला ताब्यात घेतले असून, ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण येथील एमएफसी पोलीस ठाण्यात असलेल्या गुन्ह्यात आज सुनावणी झाली. सुरेश पुजारीवर कल्याण मधील एमएफसी पोलीस ठाण्यात व्यावसायिकाला 2 कोटींची खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्यावरून गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्याच्या प्रकरणात अटक करून त्याला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

फिलिपाइन्समध्ये त्याला अटक (Arrested In Philippines) करून, त्याचे प्रत्यार्पण करुन त्याला भारतात आणण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात दहशत माजवणारा आणि खंडणीसाठी अनेकांना फोन करणारा गॅंगस्टर रवी पुजारीचा भाऊ सुरेश पुजारी आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश व्यावसायिकांसह राजकारणी व लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी गँगस्टर सुरेश पुजारी फोन करायचा.

  • It is a big success for Maharashtra Police. He will be presented before a court and we will push for his remand: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil on the arrest of gangster Suresh Pujari pic.twitter.com/svtChEqnou

    — ANI (@ANI) December 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुरेश पुजारीच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट

गँगस्टर सुरेश पुजारी याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. सुरेश याच्यावर ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास एटीएसमार्फत होत आहे. या गुन्ह्यात सुरेश पुजारी याला हजर करण्यासाठी न्यायालयाने अजामीनपात्र स्टँडिंग वॉरंट काढले होते. वॉरंट दाखवल्यानंतर सुरेश पुजारीला महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. पुजारीला घेऊन येण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचे अतिरिक्त डीजीपी विनीत अगरवाल यांनी पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करून पाठवले होते.

सुरेश पुजारीच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट
सुरेश पुजारीच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट

रवी पुजारीची साथ सोडत केली स्वतःची टोळी तयार
केबल व्यावसायिकाच्या हत्येनंतर (Cable Trader Murder) चर्चेत आलेल्या सुरेश पुजारी याने त्याचा भाऊ आणि अंडरवर्ल्ड डाॅन रवी पुजारीसोबत सुमारे दहा वर्षांपूर्वी साथ सोडत स्वतःची टोळी तयार केली होती. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर येथील डान्स बार व हॉटेल मालकांना मोबाईलवर धमकी देऊन आपल्या हस्तकामार्फत खंडणी गोळा (Thane Navi Mumbai Kalyan Dombivali Extortion Cases) करत होता. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण आणि उल्हासनगरसह नवी मुंबईच्या विविध भागात सुरेश पुजारीकडून सतत धमक्या येत होत्या. केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा (Cable Trader Sacchanand Karira Murder) यांची हत्या केल्यानंतर उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी (Ex MLA Pappu Kalani) यांचे पुत्र ओमी कलानी (Omi Kalani) यांनाही फोनवर धमकी दिली होती.

जितेंद्र आव्हाडसह भाजप आमदारालाही धमकी
गँगस्टर सुरेश पुजारी (Gangster Suresh Pujari) हा विदेशात बसून ठाणे जिल्ह्यातील व्यापारी, बांधकाम व्यावसायीकांना धमकावून खंडणी (Ransom by threatening traders builders) वसूल करत होता. यापूर्वी अशीच धमकी त्याने युतीच्या काळात आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Avhad) यांना दिली होती. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याबाबत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला आपण जबाबदार असल्याचे म्हटले होते. तर दोन वर्षांपूर्वीच कल्याण पश्चिमेकडील गांधारी माधव संकल्पच्या मागील बाजूस असलेल्या काशीष पार्कमध्ये राहणारे भास्कर शेट्टी या कँटीन व्यावसायिकाला गँगस्टर पुजारीने धमकावले होते. शेट्टी यांना फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. बऱ्याबोलाने 25 पेट्या टाक, नाहीतर ढगात पाठवीन, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे शेट्टी यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात (Khadakpada Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कल्याणचे आमदार गायकवाड यांनाही त्याने अशाच पद्धतीने धमकावल्याने राजकीय, तसेच केबल व्यावसायिक मंडळींचे धाबे दणाणले होते. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार गायकवाड यांना दिलेल्या धमकीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली होती.

कोण आहे हा गँगस्टर सुरेश पुजारी?
(Who is this gangster Suresh Pujari?) सुरेश पुजारी हा यापूर्वी उल्हासनगर येथील विश्वास ढाब्यावर नोकरी करत होता. त्यानंतर तो घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. उल्हासनगर येथील सच्छिदानंद केबल व्यवसायिकावर त्याच्या शूटरने गोळ्या झाडल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. उल्हासनगरचे बांधकाम व्यवसायिक सुमित चक्रवर्ती (Builder Sumit Chakraborty) यांना देखील सुरेश पुजारीने धमकीचा फोन केला होता. त्यावेळी सुमित चक्रवर्ती यांच्या मुलाने फोन उचलत सुरेश पुजारीला सुनावले होते. हिम्मत असेल तर समोर येऊन बोल, असे याच गँगस्टर पुजारीला खुले आव्हान दिले होते.

Last Updated : Dec 15, 2021, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.