अमरावती - उत्तर प्रदेशात प्रतिबंधित असणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या ग्रुपचा जिल्हाध्यक्ष सोहेल नदवी याला अमरावती ( Amravati ) चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नागपुरी गेट पोलिसांनी या सोहेलला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साडी हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले असून नागपूर पोलीस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून या व्यक्तीचा नेमका कुठे आणि कोणाशी संपर्क आहे, याचा तपास केला जात आहे.
छाया नगर येथील घराची झडती - पी एफ आय या ग्रुपचा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या सोहेल अन्वर्याच्या छाया नगर येथील घराची पोलिसांच्या वतीने झडती घेतली जात आहे. अमरावती शहरात घडलेल्या औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाची ( Umesh Kolhe Murder Case ) त्याचा काही संबंध आहे का? याचा तपास देखील केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी अद्याप या व्यक्तीला का ताब्यात घेतले आहे, हे अद्याप स्पष्ट केले नाही.
एनआयएचे पथकही नागपूर गेट पोलिसांना दाखल - दरम्यान एनआयएचे पथक देखील नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. सोहेल अन्वर या व्यक्तीची संपूर्ण माहिती एनआयएचे पथक देखील घेत आहे.
नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा - अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे. हत्या प्रकरण 21 जूनच्या रात्रीचे आहे. हत्या झाली तेव्हा त्यांच्या जवळील मुद्देमाल तसाच होता त्यामुळे या हत्ये पाठीमागे लुटपाट करण्याचा हेतु नव्हता हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हत्येच्या कारणांवरचा सस्पेन्स कायम होता. अखेर ही हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टमुळे झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.
मुलांसमोरच चिरला गळा - उमेश यांची गाडी जवळ येताच त्या तिघांनी त्यांना अडवे आले त्यामुळे उमेश यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्याचवेळी कोणाला काही कळायच्या आत ज्याच्या हातात चाकू होता त्याने अगदी सऱ्हाईतपणे त्यांच्या गळ्यावर चाकु चालवला. क्षणार्धात उमेश यांना मोठा रक्तश्राव सुरु झाला आणि ते त्याच अवस्थेत रस्त्यावर कोसळले. पाठीमागुन येत असलेल्या संकेत आणि वैष्णवी यांच्या समोरच उमेश यांचा गळा चिरला गेला आणि ते पडले वार इतका मोठा होता की उमेश यांना जागेवरुन हालताही आले नाही. कोणाला काही कळायच्या आत हा प्रकार घडला होता.