बस्ती - सोन्याच्या दुकानात आलेल्या दोन महिलांनी झुमक्यावर हात साफ केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने उघडकीस आली. ही घटना बस्ती येथील वाल्टरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. बस्ती पोलिसांना पुरुष चोरट्य़ांसह आता महिला चोरांनीही आव्हान दिल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.
दागिने पाहण्याच्या बहाण्याने चोरले दागिने : वाल्टरगंज परिसरातील एका सोन्याच्या दुकानात दोन महिला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईन पाहण्याचा बहाणा केला. त्यामुळे दुकानमालक चांगलाच गोंधळला. दुकानदार सोन्याचे डिझाईन दाखवण्यात व्यस्त असतानाच या दोन महिलांनी सोन्याच्या झुमक्यावर हात साफ केला. त्यानंतर या महिलांनी आपल्याला हे डिझाईन आवडत नसल्याचे सांगत दुकानातून काढता पाय घेतला.
सोन्याचे एक झुमके गायब असल्याने खळबळ : दुकानदार सोन्याचे दागिने ठेवत असताना त्याला एक सोन्याचे झुमके गायब असल्याचे आढळून आले. यानंतर दुकानदाराने त्याच्या दुकानात लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या दुकानात सोन्याचे दागिने घेण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी हाच चलाखीने सोन्याचे झुमके काढून घेतल्याचे या सीसीटीव्हीत दिसून आले.
दागिने चोरणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल : सोन्याचे दागिने घेण्यास आलेल्या महिलांनी झुमक्यावर हात साफ केल्यामुळे खळबळ उडाली. दुकानदाराने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेतील सीसीटीव्ही चेक केले आहे. दोन्ही महिला चोरांच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चोरीच्या घटनामध्ये वाढ : बस्ती परिसरात चोरीच्या घटनात वारंवार वाढ होत आहे. चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यातच आता महिला चोरही मागे राहिल्या नाहीत. सोन्याच्या दुकानातून महिला चोर मोठ्या हातसफाईने दागिने लांबवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही गुन्हेगांराचा चोरट्यांवर कोणताही वचक राहिला नसल्याचे यातून दिसून येत आहे. बस्तीत महिला चोरट्यांचाही मोठा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले आहे. दिवसाढवळ्या महिला चोर दुकानातील दागिन्यावर हात साफ करत आहेत.
हेही वाचा - Bride Refused Marry : पैसे न मोजता आल्याने नवरीचा अंगुठाछाप नवरदेवासोबत लग्न करण्यास नकार
हेही वाचा - Bangladeshi Citizens Arrested In Thane : उल्हासनगरातून ४ बांगलादेशी नागरिकांना अटक