चंद्रपूर : जिल्ह्यात क्रूरतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे, गावातील काही टवाळखोर पोरांनी एका कुत्र्याला दगड बांधून पाण्यात फेकले, त्यातून तो बाहेर आल्यावर पुन्हा दगड बांधून त्याला बुडविण्यात ( The dog was tied to a stone and thrown into the water ) आले. यातच कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate death of a dog ) झाला. बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावातील ही घटना आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. याबाबत बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण? बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये दिनकर गायकवाड यांच्या मालकीचा पाळीव कुत्रा आहे. तो एका जनावर आणि माणसाला चावला असल्याची माहिती आहे. त्यावर त्यांनी या पाळीव कुत्र्याला अमानुषपणे ठार केले. तीन ते चार युवकांनी प्रथम कुत्र्याच्या पायाला दगड बांधला आणि मानेला फास आवळून त्याला नदीच्या पाण्यात फेकून दिले. जिवाच्या आकांताने मोठ्या प्रयत्नाने तो नदीतून पोहून बाहेर आला. पाळीव असल्याने पुन्हा तो त्या युवकांजवळ आला. मात्र त्याला मारण्याचा पूर्णपणे विचार करून आलेल्या युवकांनी त्याचे पाय बांधून भलामोठा दगड बांधला. त्यानंतर तोंडाला ताराने बांधून पुन्हा नदीच्या पाण्यात फेकले. या वेळी मात्र तो पाण्यातून वर आलाच नाही. याची गंभीर दखल घेत प्राण्यांबाबत काम करणाऱ्या प्यार संघटनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. बल्लारपूर पोलीस ठाण्यात ( Ballarpur Police Station ) दिनकर गायकवाड आणि त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर समाजात सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Baramati Crime : महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार; पतीसह मित्रावर गुन्हा दाखल