ETV Bharat / crime

Chembur Murder Case : टॅक्सी चालकाकडून पत्नीचा भररस्त्यात खून; चेंबूरमधील खळबळजनक घटना - Mumbai Chembur Crime Case

चेंबूरमधील राहुलनगर येथील एका टॅक्सी चालकाने पत्नी सोडचिठ्ठी मागते म्हणून ( Taxi Driver Killed his Wife with a Sharp Weapon ) धारदार शस्त्राने तिची हत्या ( Sensational Incident in Chembur ) केली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा ( Tilaknagar Police Station in Registering a Case ) दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. थोड्याच वेळात अटक करण्यात येईल, असे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी ( Mumbai Chembur Crime Case ) सांगितले.

Chembur Murder Case
टॅक्सी चालकाकडून पत्नीचा भररस्त्यात खून
author img

By

Published : Sep 27, 2022, 11:26 AM IST

Updated : Sep 27, 2022, 1:35 PM IST

मुंबई : चेंबूर परिसरातील राहुलनगर येथे एका टॅक्सी चालकाने पत्नीने सोडचिठ्ठी मागितली म्हणून धारदार शस्त्राने तिची ( Taxi Driver Killed his Wife with a Sharp Weapon ) हत्या केली. ( Sensational Incident in Chembur ) याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी टॅक्सी चालक इकबाल शेख (वय 36) याला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, थोड्याच वेळात अटक करण्यात येईल, असे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ( Mumbai Chembur Crime Case ) काळे यांनी ( Tilaknagar Police Station in Registering a Case ) सांगितले.

टॅक्सी चालकाकडून पत्नीचा भररस्त्यात खून

मृत महिलेच्या बहिणेने केली तक्रार दाखल : टिळकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आयपीसी कलम 302, 37 (1) (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेची बहीण करुणा रॉयल हिने याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 27 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास हा गुन्हा घडला. या प्रकरणी मध्यरात्री अडीचच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. चेंबूर येथील रूम नंबर 1 व 141 समोर गल्लीमध्ये प्रगतीचा राहुलनगर येथे इकबाल अहमद शेख ( वय 36 ) हा जारा ( वय २०) कड़े आला.

सोडचिठ्ठी मागितली म्हणून केला खून : त्यावेळी जाराने इक्बाल शेख याच्याकडे सोडचिठ्ठी मागितली. त्याने सोडचिठ्ठी दिली नाही या कारणावरून तिचा इक्बाल शेख याने त्याच्याजवळील धारदार सुराने तिच्या गळ्यावर व हातावर वार करून तिचा खून केला. त्यामुळे मृत महिलेची बहीण रॉयल हिने इक्बाल महमद शेख याचेविरुद्ध तक्रार दिल्याने कलम 302 भादवी सह कलम 37(१)(अ), १३५ म.पो.आ. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जारा आणि इकबाल हे गेले काही वर्ष एकत्र राहत होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले दोघांना लहान मुलगा असून त्यानंतर जाराला इक्बाल आवडेनासा वाटू लागला. दरम्यान, दादरमधील एका हॉस्टेलमध्ये जारा काही काळ राहिली आणि त्यानंतर ती चेंबूर येथील राहुलनगर परिसरातील मैत्रिणीसोबत रूम शेअर करून आपल्या लहानग्या मुलाबरोबर राहत होती. मात्र, इक्बालला आपल्याला लहान मुलाचा ताबा हवा असल्याने त्यांच्यात वारंवार खटके उडत असत.

पत्नीचा चाकूने अनेक वार करून निर्घृण खून : मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा चाकूने अनेक वार करून निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर लगेचच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षांपूर्वी मोहम्मद इक्बाल शेख याने मृत रुपालीशी विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांनी आरोपी इक्बालचे कुटुंबीय एकत्र राहायला आले आणि रुपालीवर मुस्लिम रितीरिवाज पाळण्यासाठी, बुरखा घालण्यासाठी दबाव टाकू लागले. पण रुपालीने त्यांचे ऐकले नाही. यावरून अनेकदा कुटुंबात भांडणे होत असत.

टिळकनगर पोलिसांनी आरोपी इक्बालला घेतले ताब्यात : रुपालीला मुलगाही झाला, त्यानंतर दोघांमध्ये दुरावा होऊन नात्याचा कंटाळा आला. रुपाली वेगळी राहू लागली, पती-पत्नीमध्ये फोनवर बोलणे होत असे. मात्र, मुस्लिम प्रथा पाळण्यावरून भांडण झाले. सोमवारी आरोपी इक्बालने रुपालीला भेटायला बोलावले. रुपालीने इक्बालला घटस्फोट देण्यास सांगितले. त्यावर इक्बालने मुलाचा हवाला देत घटस्फोट न देण्याचे बोलले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हाणामारी झाली. त्यानंतर इक्बालने पत्नी रुपालीला जवळच्या रस्त्यावर ओढत नेले आणि तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला, गंभीर जखमी रुपालीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. पोलीस येण्यापूर्वीच तो फरार झाली, मात्र, घटनेनंतर काही वेळातच टिळकनगर पोलिसांनी आरोपी इक्बाल याला ताब्यात घेतले.

रुपालीशी लग्नाआधी इकबालचे झाले होते लग्न : रुपालीशी लग्नाआधी इकबालचे लग्न झाले होते, मात्र मुलबाळ नसल्यामुळे इक्बालने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर इकबालने रुपाली या हिंदू धर्मातील मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर मुस्लिम रितीरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, मात्र, पोलीस गुन्हा दाखल करून आरोपी इक्बालचा शोध घेत आहेत. हत्येचे प्रकरण आहे, तर मृताच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर मुस्लिम प्रथा पाळण्याचा दबाव असल्याचा आरोप केला आहे.

विलास राठोड पोलीस निरीक्षक टिळकनगर यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.आरोपी इकबाल शेख याने त्याच्या 23 वर्षीय पत्नीवर चाकूने अमानुष वार केले, मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की इक्बाल मुस्लिम आणि रुपाली हे हिंदू होते. त्यामुळे इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय रुपालीवर मुस्लिम प्रथा स्वीकारण्यासाठी, बुरखा घालण्यासाठी दबाव टाकत होते, या आरोपात किती तथ्य आहे, याचा तपास सुरू असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Sep 27, 2022, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.