पुणे - आपल्या वडिलांना जेवणाचा डबा देऊन 7 वर्षाची एक मुलगी परत येत असताना पुणे स्टेशन परिसरात तिचं अपहरण करून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुण्यातील ताडीवाला रोड परिसरातील अल्पवयीन मुलगी आपल्या वडीलांना जेवणाचा डब्बा देऊन परत येत आसतानाचा तिच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे.
गुन्हा दाखल - बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात घेत असून आता पोलिसांकडून अतिप्रसंग करणाऱ्या माथेफिरु तरुणाचे रेखाचित्र जारी करण्यात आली आहे.
अधिकचा तपास पुणे पोलीसांकडे - रस्तावरुन जाणाऱ्या मुलीला माथेफिरुने रेल्वे स्टेशनच्या प्लॕटफॉर्म क्रमांक 6 च्या जवळून अपहरण करत एका बंद आॕफीसमध्ये नेऊन अश्लिल चाळे करत आसताना पिडीत मुलीने लघुशंकेचा बाहाना करुन तिथून आपली सुटका केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पुणे पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Wife Burned Husband : बायकोने नवऱ्याची हत्या करुन शरीराचे तुकडे जाळले