पुणे : पुण्यातल्या नांदेड सिटी या रेसिडेंशियल टाऊनशीपमध्ये चालत असणाऱ्या ( Prostitution parlors raided in Pune Nanded City ) वेश्याव्यवसायावर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. नांदेड सिटीतील डेस्टिनेशन मॉलमधील ब्ल्यू बेरी स्पा अँड मसाज पार्लरवर छापा टाकत ही ( Pune Rural Police Raided on Blue Berry Massage Parlor ) कारवाई करण्यात आली आहे. यातून पोलिसांनी एका मलेशिया आणि दोन स्थानिक तरुणींची सुटका केली आहे.
पोलिसांकडून मसाज सेंटर मालकाला अटक या प्रकरणी मसाज सेंटर मालक मुंजा रामदास शिंदे (वय 31, रा. वडगाव) योगेश पवार (रा. नांदेड गाव) व्यवस्थापक अथर्व प्रशांत उभे (वय 19, रा. बेनकर वस्ती, धायरी), आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झालं आहेत. यातील मुंजा शिंदे, अथर्व उभे आणि महिलेला यांना अटक करण्यात आली आहे. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड सिटी येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय नांदेड सिटी येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या मसाज सेंटरवर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला आणि येथे मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हीसचे नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला.
पीडित तरुणींना पाठविले सुधारगृहात त्यावेळी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दोघे मॅनेजर तसेच एक परदेशी व दोन स्थानिक पीडित तरुणी आढळल्या. यातील पीडित ३ तरुणींना महिला सुधारगृह येथे पाठविण्यात आले आहे. त्यावेळी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दोघे मॅनेजर तसेच एक परदेशी व दोन स्थानिक पिडीत तरुणी आढळल्या. यातील पिडीत ३ तरुणींना महिला सुधारगृह येथे पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा : Congress Halla Bol Rally : काँग्रेसची रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरोधात 'हल्ला बोल' रॅली