ठाणे : मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा लोहमार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासत असताना टीसीवर प्रवाशाने ( Passenger Fatally Attacks TC with Sharp Blade ) धारदार ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ( Shocking Incident has Taken Place When Passenger Attacked ) आहे. या हल्ल्यात टीसी गंभीर जखमी झाला ( TC has been Seriously Injured in This Attack ) असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुनील गुप्ता, असे गंभीर जखमी झालेल्या टीसीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रवाशांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
टीसी गुप्ता हे प्रवाशांकडील तिकीट तपासणी करताना केला हल्ला : लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर गुप्ता हे प्रवाशांकडील तिकीट तपासणी करीत होते. याच सुमाराला एका प्रवाशाला त्यांनी तिकीटबाबत विचारणा करून तिकीट दाखवायला सांगितले. मात्र, त्या प्रवाशाने प्लॅटफॉर्मवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान टीसी गुप्ता हे त्या प्रवाशाला पकडण्याचा प्रयत्न केला असताना प्रवाशाने खिशातले धारदार ब्लेड काढत त्यांच्या मानेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
गुप्ता यांना तत्काळ कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल : दरम्यान, जखमी अवस्थेत गुप्ता यांना तत्काळ कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यात सुनील गुप्ता यांचा जीव बचावला असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. तर लोहमार्ग पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोर प्रवाशांचा शोध सुरू केला आहे.