ETV Bharat / crime

Nagpur Doctor Suicide : डॉक्टर महिलेची विषयुक्त इंजेक्शन घेऊन आत्महत्या - विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

जीवनात नैराश्य आल्याने एका डॉक्टर महिलेने स्वतःला विष असलेले इंजेक्शन लावून आत्महत्या (Frustreted Doctor Woman Committed Suicide) केली. नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या (Jaripataka Police Station) हद्दीतील नागसेन नगरमध्ये ही घटना घडली. डॉ. आकांक्षा मेश्राम (Dr Akanksha Meshram Suicide) असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे.

jaripatka
jaripatka
author img

By

Published : Dec 12, 2021, 4:50 PM IST

नागपूर - नैराश्यातून एका डॉक्टर महिलेने स्वतःलाच विषयुक्त इंजेक्शन लावून आत्महत्या (Frustrated Doctor Woman Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरातील (Nagpur City) जरीपटका पोलीस स्टेशनच्या (Jaripataka Police Station) हद्दीतीळ नागसेन नगरात घडली आहे. डॉ. आकांक्षा मेश्राम असे आत्महत्या (Dr Akanksha Meshram Suicide) करणाऱ्या महिलेचे नाव असून त्या सध्या मेडिकल प्रॅक्टिस करत नव्हत्या.

नैराश्यातून डॉक्टर महिलेने स्वतःलाच विषयुक्त इंजेक्शन लावून आत्महत्या

२०१९ मध्ये पती-पत्नी झाले होते विभक्त

डॉ. आकांक्षा मेश्राम यांचा घटस्फोट (Dr. Akanksha Meshram Divorce) झाल्याने त्या गेल्या वर्षीपासून जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागसेन नगर येथे राहणाऱ्या आई वडिलांकडे वास्तव्यास होत्या. डॉ. आकांक्षा यांचे एमडी पर्यंतच शिक्षण झालेलं होतं. 2017 मध्ये डॉ. आकांक्षा यांचे लग्न झालं मात्र, वैवाहिक जीवनात वैतुष्ट आल्याने 2019 मध्ये पती- पत्नी विभक्त झाले. डॉ. आकांक्षा या सोलापूरमधील रुग्णालयात सरकारी (Government Hospital Solapur) नोकरीवर होत्या. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Covid First Wave) त्या आईवडिलांकडे राहायला आल्या. घरी सगळं सुरळीत असताना डॉ. आकांक्षा यांनी विषारी इंजेक्शनच्या माध्यमातून विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide By Injecting Poison) केली.

घटनास्थळा वरून सुसाईड नोट जप्त
डॉ. आकांक्षा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली होती. पोलिसांनी घटनास्थळा वरून ती सुसाईड नोट जप्त केली आहे. जीवनात आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं त्या नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, जरीपटका पोलीस पुढील तपास करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.