मुंबई : मुंबई एअरपोर्टवर नोकरी लावून देण्याकरिता घाटकोपर येथील तरुणीची 73 हजार रुपये घेऊन फसवणूक झाली आहे. ही फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव अभिजित परमेश्वर गाढवे (26) ( Abhijit Parmeshwar Gadhave ) आहे. त्याने आयपीएस असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला अटक ( Abhijeet Arrested by Sakinaka Police ) करण्यात आली आहे.
मॅट्रोमोनी साईटवर झाली ओळख : तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून, आरोपी तरुणाची एका मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाली होती. या भामट्याने तरुणीस एअरपोर्टमध्ये ऑफिसर पदावर नोकरी लावण्याचे बोगस प्रमाणपत्र देऊन 73 हजार रुपयेदेखील उकळले ( Also Boiled Rs 73,000 by Giving a Bogus Certificate ) होते. याशिवाय खोटी कौटुंबिक माहितीही दिली होती. अभिजीत परमेश्वर गाढवे (26) फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभिजीतला साकीनाका पोलिसांनी घाटकोपर येथून अटक केली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत. आरोपीने अजून किती मुलींची फसवणूक केली आहे याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
स्वतः आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून फसवले : मॅट्रीमोनी साईटद्वारे आरोपी अभिजीत परमेश्वर गाढवे याच्याशी फिर्यादीची ओळख झाली होती. या संकेतस्थळावर आरोपीने आपली ओळख आयपीएस अधिकारी अशी भासवत वडील रिटायर आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. शिवाय आपली सातारा येथे स्ट्रॉबेरीची शेती असल्याचेदेखील म्हटले होते. यामुळे फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जवळीक वाढली.
एअरपोर्ट ऑफिसर पदावर लावण्याचे आमिष : यानंतर मुंबई विमानतळावरील इंटर ग्लोब एव्हिएशन लिमिटेड कंपनीत ऑफिसर पदावर कामावर लावण्यासाठी 73 हजार 900 रुपये घेऊन आरोपीने संबंधित तरुणीला बोगस जॉइनिंग लेटर दिले. मात्र, हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे ध्यानात येताच संबंधित तरुणीने या घटनेविषयी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार केली. साकीनाका पोलिसांनी आपल्या खबऱ्यामार्फत आरोपीचा शोध घेऊन त्याला घाटकोपर परिसरातून अटक केली आहे. या संदर्भात अधिक तपास साकीनाका पोलीस करीत आहेत.
हेही वाचा : Devendra Fadnavis raj thackery meeting: अमित ठाकरेंची राजकारणात एंन्ट्री?; देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची "शिवतीर्थावर" भेट
हेही वाचा : Shiv Sena leader Sanjay Raut in Nagpur : हे सरकार हिंदुत्वद्रोही; खरे मुख्यमंत्री फडणवीसच-संजय राऊत
हेही वाचा : Shinde government : शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी धक्का; नामांतराच्या निर्णयाला दिली स्थगिती