ETV Bharat / crime

पोलीस शिपायाचा सुपारी देऊन खून; महिला पोलिसासह दोघे गजाआड - new mumbai crime news

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली नॅनो कार व कपडे जाळून टाकली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पनवेल शहर पोलिसांनी सखोल तपास करीत या गुन्ह्याची उकल केली. याबाबतची सविस्तर माहिती वाचा.

पोलीस
पोलीस
author img

By

Published : Sep 9, 2021, 7:30 PM IST

Updated : Sep 9, 2021, 7:50 PM IST

नवी मुंबई - कामावर झालेल्या वादाचा राग मनात धरून पोलिस शिपायाची हत्या महिला पोलिसाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. ही खुनाची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस महिलेला तिच्या दोन साथीदारांसह गजाआड केले आहे.

मृत पोलीस शिपाई शिवाजी सानप (54) व महिला पोलीस शिपाई शितल पानसरे हे दोघेही मुंबई येथील पोलीस ठाण्यात एकत्र कार्यरत होते. शितल व शिवाजी यांचे भांडण झाले. त्याचाच राग मनात धरून शीतल हिने शिवाजी यांच्या हत्येची सुपारी देत त्यांचा अपघात घडवून आणला. त्यासाठी तिने खुनाची सुपारी दिली होती. या अपघातात शिवाजी यांना जबरदस्त लागल्याने शिवाजी हे जागीच ठार झाले. पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून पायी जात असताना त्यांना जीवे ठार मारण्याचा हेतूने विशाल जाधव व बबन चव्हाण यांच्या वाहनाने जबरदस्त ठोकर दिली होती.

पोलीस महिलेला तिच्या दोन साथीदारांसह गजाआड

हेही वाचा-जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर विजेच्या धक्क्यामुळे दोन भावांचा मृत्यू

गुन्ह्यात वापरलेली नॅनो कार जाळली

पोलीस शिपाई शिवाजी सानप
पोलीस शिपाई शिवाजी सानप
पोलिसांच्या माध्यमातून कुर्ला ते पनवेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दोन अनोळखी व्यक्ती पनवेल रेल्वे स्थानकात नॅनो कार पार्क करताना दिसत होते. कुर्ला ते पनवेल दरम्यान शिवाजी सानप यांचा लोकल रेल्वेने पाठलाग करीत होते. संबधित व्यक्तिला सानप यांचे नातेवाईक यांनी ओळखले. विशाल बबन जाधव हा आरोपी शीतल पानसरे राहत असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर महिला पोलीस शिपाई शीतल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण हे वेळोवेळी पनवेल रेल्वे स्थानक परिसरात आढळून आले होते. तसेच पोलीस शिपाई शिवाजी सानप हे पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून जात असता त्यांना नॅनो कारची जोरदार धडक दिली. अपघात करून विशाल जाधव व गणेश चव्हाण यांनी त्यांचा खून केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली नॅनो कार व कपडे जाळून टाकली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पनवेल शहर पोलिसांनी सखोल तपास करीत या गुन्ह्याची उकल केली.

हेही वाचा-कपडे वाळत घालताना आठव्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

महिला पोलीसाने दबाव टाकून केला खून

विशेष म्हणजे हत्येची सुपारी देणारी पोलीस शिपाई शीतल पानसरे हिने इंस्टाग्राम वर विशाल जाधव याच्याशी मैत्री करीत घाईघाईने लग्न केले व त्याच्यावर दबाव टाकून त्याला खून शिवाजी सानप यांचा करण्यास प्रवृत्त केले.

हेही वाचा-अपहरण करत सहा वर्षाच्या चिमुरडीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार

Last Updated : Sep 9, 2021, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.