ETV Bharat / crime

Sonam Kappors Nurse Arrest : सोनम कपूरच्या घरी २ कोटी ४० लाखांची चोरी करणाऱ्या जोडप्यास अटक

सोनमच्या घरी काम करणाऱ्या एका परिचारिकेला ( nurse working at Sonams house ) तिच्या पतीसह आलिशान अमृता शेरगिल मार्गावरील ( luxurious Amrita Shergill house ) घरातून फेब्रुवारी महिन्यात २.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली ( sonam Kapoors nurse arrest ) आहे. अटक करण्यात आलेली परिचारिका सोनमच्या सासूची देखभाल करीत होती

सोनम कपूरच्या घरी चोरी
सोनम कपूरच्या घरी चोरी
author img

By

Published : Apr 13, 2022, 6:58 PM IST

Updated : Apr 13, 2022, 10:59 PM IST

नवी दिल्ली - अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील निवासस्थानी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनमच्या घरी काम करणाऱ्या एका परिचारिकेला तिच्या पतीसह आलिशान अमृता शेरगिल मार्गावरील घरातून फेब्रुवारी महिन्यात २.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. अपर्णा रुथ विल्सन सोनमच्या सासूची काळजी घेत असते. तिचा पती पती नरेश कुमार सागर हा शकरपूर येथील एका खाजगी फर्ममध्ये अकाउंटंट आहे.

सोनमच्या घरी काम करणाऱ्या एका परिचारिकेला ( nurse working at Sonams house ) तिच्या पतीसह आलिशान अमृता शेरगिल मार्गावरील ( luxurious Amrita Shergill house ) घरातून फेब्रुवारी महिन्यात २.४ कोटी रुपयांची रोकड आणि दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली ( sonam Kapoors nurse arrest ) आहे. अटक करण्यात आलेली परिचारिका सोनमच्या सासूची देखभाल करीत होती.

ही चोरी 11 फेब्रुवारी रोजी घडली होती आणि तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये 23 फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील तक्रारदार सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या घराचे व्यवस्थापक होते. सोनमच्या निवासस्थानी 20 पेक्षा जास्त लोक काम करतात. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवी दिल्ली जिल्ह्याच्या विशेष कर्मचारी शाखेच्या पथकासह सरिता विहारमध्ये मंगळवारी रात्री छापा टाकला. त्यांनी विल्सन आणि तिचा पती या दोघांना अटक केली," चोरीचे दागिने आणि रोख रक्कम अद्याप जप्त करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, पुढील तपास सुरू असून अमृता शेरगिल मार्गावरील घरात काम करणाऱ्या बहुतांश लोकांची चौकशी करण्यात आली आहे. तुघलक रोड पोलिस स्टेशनने हे प्रकरण तपासासाठी नवी दिल्ली जिल्ह्याच्या विशेष कर्मचारी शाखेकडे हस्तांतरित केले होते. गुन्हे शाखा देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

मार्चमध्ये, फरीदाबाद पोलिसांनी अत्यंत अत्याधुनिक सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला होता ज्याने कपूरच्या सासरच्या निर्यात-आयात कंपनीची 27 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी तेव्हा म्हटले होते की, हरीश आहुजाच्या बनावट डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्राच्या आधारे फसवणूक करणारे हरीश आहुजाच्या शाही एक्सपोर्ट फॅक्टरीमध्ये राज्य आणि केंद्रीय कर आणि लेव्हीज परवान्यांचा गैरवापर करत होते.

हेही वाचा - रणवीर आलिया विवाह : कडक बंदोबस्तात रणवीरच्या घरी लग्न उत्सवाला सुरूवात

Last Updated : Apr 13, 2022, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.