ETV Bharat / crime

झोक्याच्या दोरीने लागला गळफास; मामाच्या गावी आलेल्या चिमुकल्याचा मृत्यू

सात वर्षीय चिमुकल्याचा झोका खेळताना गळ्याभोंवती दोरीचा फास बसल्याने मृत्यू ( Aurangabad Toddler Dies ) झाल्याची दुर्दैवी घटना ( Aurangabad incident ) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या भगूर या गावी घडली.

Aurangabad Toddler Dies
चिमुकल्याचा मृत्यू
author img

By

Published : Sep 2, 2022, 4:32 PM IST

औरंगाबाद : सणानिमित्त मामाच्या गावी आलेल्या सात वर्षीय चिमुकल्याचा झोका खेळताना गळ्याभोंवती दोरीचा फास बसल्याने मृत्यू ( Death of a toddler who came to his maternal uncle's village ) झाल्याची दुर्दैवी घटना ( Aurangabad incident ) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या भगूर या गावी घडली. पुष्कर सुभाषराव पोटे वय -७ ( रा.शंकरपूर, ता.गंगापूर जि. औरंगाबाद) ( Aurangabad Toddler Dies ) असे मृत मुलाचे नाव आहे.

झोका खेळता-खेळता गळ्याभोवती फास - या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुष्कर हा पहिली वर्गात शिकत होता. पोटे दाम्पत्यांना तीन मुली होत्या तर पुष्कर हा एकुलता एक मुलगा होता. सनानिमित्ताने तो वैजापूर तालुक्यातील भगूर ( Vaijapur Taluka Bhagur ) येथे मामाच्या गावी आला होता. गुरुवारी मामाच्या घराबाहेर मळणीयंत्र सुरु होते. तर घरात पुष्कर हा झोका खेळत होता. झोका खेळता-खेळता झोका गोल फिरला आणी दोरीला वेढा पडत गेला. दरम्यान पुष्करचा गळा त्या दोरीत अडकला. त्याला ते सोडविता आले नाही. गुरुवारी गळ्याभोवती फास बसून झोक्यावर तो निपचित अडकलेला होता. बाहेरून सर्व सदस्य जेंव्हा घरात आले तेंव्हा हा प्रकार समोर आला. पुष्करला घेऊन तातडीने ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात ( Virgaon Police Station ) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरातील एकुलता एक मुलगा अशपद्धतीने मृत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: टोहाना हरियाणामध्ये विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.