ETV Bharat / crime

Purnia Gangrape Agttempt : धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेने बसमधूनच घेतली उडी, गंभीर जखमी - धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

बिहारच्या पूर्णियामध्ये निर्भयासारखी घृणास्पद घटना समोर आली आहे. दार्जिलिंगमधील एका महिलेवर चालत्या बसमध्ये बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने बसच्या खिडकीतून उडी मारली. पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ATTEMPT TO RAPE WITH DARJEELING WOMAN IN RUNNING BUS IN PURNEA BIHAR
धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेने बसमधूनच घेतली उडी, गंभीर जखमी
author img

By

Published : Jan 25, 2023, 6:30 PM IST

पूर्णिया (बिहार) : 'मंगळवारी संध्याकाळी उशिरा सिलीगुडी जंक्शनवरून बस निघाली त्यावेळी बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. मात्र, जसजसा वेळ जात होता, तसतशी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे बसच्या एका बाजूला बसलेल्या ५ तरुणांनी मला एकटीला पाहून घाणेरडे हातवारे करण्यास सुरुवात केली. काही वेळाने तरुण जवळ आला आणि स्पर्श करू लागला आणि घाणेरड्या नजरेने पाहू लागला', असे पीडितेने सांगितले. ही घटना त्या महिलेची आहे, जी सध्या रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहे.

महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न : चालत्या बसमध्ये तिच्यावर कसा बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे पीडितेने सांगितले. आरोपीपासून वाचण्यासाठी महिलेने चालत्या बसच्या खिडकीतून उडी मारली. यानंतर महिला गंभीर जखमी झाली. पीडितेला घटनास्थळीच सोडून बस वेगाने निघून गेली. 'मी बसमध्ये बसले तेव्हा बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. काही वेळाने बस रिकामी झाली. मला एकटीला पाहून 5 तरुणांनी आधी अश्लील हावभाव केले, नंतर जवळ येऊन मला घेरले आणि माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर आणि कंडक्टरनेही मला वाचवण्यासाठी काहीही केले नाही,' असे पीडितेने सांगितले.

पीडितेची प्रकृती चिंताजनक: बियासी पोलिसांच्या मदतीने मुलीला पूर्णिया येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सध्या ही मुलगी जीवन-मरणाची लढाई लढत आहे. ती पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ती व्यवसायाने शिक्षिका आहे. 5 युवक तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना बसच्या चालक आणि कंडक्टरची मदत तिने मागितली. मात्र आरोपींची संख्या जास्त असल्याने ड्रायव्हर आणि कंडक्टरने काही केले नाही. या संपूर्ण घटनेने महिला खूपच घाबरली आणि आपली अब्रु वाचवण्यासाठी तिने चालत्या बसच्या खिडकीतून उडी मारली.

माहिती मिळताच पोलीस हजर: दुसरीकडे, बियासी पोलीस ठाण्यातून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गस्त घालत असताना मुलीने बसमधून उडी मारल्याची माहिती त्यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी पाहिले की ती महिला रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडली होती. मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्णिया येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले आहे. येथे मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. बसची लवकरात लवकर माहिती काढली जाईल. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस सक्रियपणे काम करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Man Chops Off His Private Part In Bihar पत्नी माहेरात गेल्याने संतापलेल्या पतीने आपले गुप्तांग कापून वाहिले कुलदेवतेला बिहारमध्ये खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.