मुंबई - मुंबईतील खार परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या 37 वर्षीय ब्युटीशियनचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात खार पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अया कडवाला आणि तिचा भाऊ फैज कडवाला अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना आज बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर ( Bandra Municipal Magistrate Court ) हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार - खार लिंक रोडवर ( Khar Link Road ) शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जेव्हा आयाने चालविलेल्या एका कारने तक्रारदाराच्या दुचाकीला धडक दिली ज्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. दरम्यान आयाने तिचा भाऊ फैजला फोन केला ज्याने त्याच्या मित्रांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. या सर्वांनी तक्रारदार महिला व तिचा चुलत भाऊ यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तिची सोनसाखळी आणि दुचाकी हिसकावून घेतली आणि तिला त्यांच्या कारमध्ये नेले. ते वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये गेले जेथे त्यांनी पुन्हा महिलेला शिवीगाळ केली आणि धमकावले. असा प्रथम माहिती अहवाल अधिकाऱ्याने सांगितला.
भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली अटक - तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर मध्ये महिलेने भाऊ-बहीण आणि पाच अनोळखी व्यक्तींची नावे दिली आहेत. पोलिसांनी रविवारी आया, फैज आणि आणखी एका व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या 365 आणि 392 यासह विविध कलमांखाली अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू असून आज या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: ११ मुलींना अटक, सेक्स चॅटमध्ये अनेक प्रसिद्ध राजकारण्यांची नावे!