सातारा : जिल्ह्यातील म्हसवे गावात बंद असलेल्या एका घरात ५ वर्षांच्या बालकाचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. या बालकाचा अज्ञाताने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला.
हा खून कोणी केला, कोणत्या कारणावरुन झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन झाल्यानंतर या गुन्ह्यावर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
विघ्नेश दत्तात्रय चोपडे (वय ५ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह गावातीलच सदानंद रामचंद्र सोनमळे यांच्या बंद घरात, किचनमध्ये आढळला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या खुनाबाबत गुन्ह्याची नोंद झाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच...