ETV Bharat / crime

जेएनपीटी बंदरातून 21 कोटी 60 लाख विदेशी सिगारेट जप्त - raigad latest crime news

जेएनपीटी बंदर अनेकदा तस्करीच्या घटनांमुळे चर्चेला आले आहे. यामुळे आयात निर्यातीच्या माध्यमातून तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. विविध शक्कल लढवून तस्करी करण्यात येत असताना, विदेशी सिगारेटची मोठी तस्करी समोर आल्याने, पुन्हा एकदा जेएनपीटी बंदरामध्ये तस्करांची टोळी सक्रिय झाल्याचे निष्पन्न होत आहे.

सिगारेट
सिगारेट
author img

By

Published : Mar 2, 2021, 1:08 PM IST

रायगड- उरणमधील जेएनपीटी बंदरामध्ये पुन्हा एकदा विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. केवायसी कागदपत्रांचा गैरवापर करून या सिगरेट दुबईतून मुंबईकडे पाठवण्यात येत होत्या. डीआरआय मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा -शेवा बंदर परिसरातील एका सीएफएसमधील कंटेनरमधून २१ कोटी ६० लाख सिगारेटस् हस्तगत केल्या आहेत. ज्यांची बाजारात किंमत पावणेपाच कोटी सांगण्यात येत आहे.

लेदर ओलेटच्या नावाखाली तस्करी
जेएनपीटी बंदरामध्ये तस्करांचा टोळी कार्यरत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. आत्तापर्यंत लालचंदन, हत्यारे, स्फोटके, फटाके यांची तस्करी करण्यात येत होती. मात्र, आता नव्याने विदेशी सिगारेट तस्करी समोर येत आहे. लेदर वॉलेटच्या नावाखाली ह्या विदेशी सिगरेट तस्करी मार्गाने दुबईतुन मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडे पाठविण्यात येत होत्या. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या मुंबई युनिटने न्हावा -शेवा बंदर परिसरातील एका सीएफएसमधील एका संशयित कंटेनरची तपासणी केली. तपासणीत लेदर वॉयलेटच्या साठ्यात २१ कोटी ६० लाख सिगारेटस् लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. सिगारेट आयातप्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने अधिक माहिती देता येणार नाही. मात्र, तपास सुरु असल्याची माहिती डीआरआय सुत्रांनी दिली

तस्करांची टोळी पुन्हा सक्रीय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.