ठाणे - अतिशय शिस्तबद्ध आयएएस अधिकारी आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे अलीकडच्या महाविकास आघाडीच्या काळात अडगळीत पडलेले पाहायला मिळत होते. मात्र, शिंदे फडणवीस सरकार येताच मुंढे पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीच आरोग्य सेवा आणि संचालक आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारताच मुंढे यांच्या प्रतिमेचा प्रत्यय पुन्हा येऊ लागला आहे. त्याच बरोबर राज्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र मुंढे आला रे आला या दहशतीत दिसून येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार - तुकाराम मुंढे हे शिस्तबद्ध आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी आपल्या कामाने ओळख आणि कर्मचारी वर्गावर दबदबा निर्माण करतात. तर याच मुंढेंची आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु केला आहे. तुकाराम मुंढे यांनी गुरुवार पासून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय रुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांसह धाडसत्राला सुरुवात करुन पाहणी दरम्यान जे डॉक्टर, अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ची सुचना दिल्यानंतर नेहमीच ऑक्सिजनवर असलेल ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालय चांगलंच कामाला लागलं आहे.
आरोग्य व्यवस्थेची चांगलीच काळजी - तुकाराम मुंढे इथे हि कधी पण धाड टाकतील या दहशतीमुळे सिव्हिल रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या सफाई कर्मचाऱ्यांवर रुग्णालयाची वेळोवेळी साफसफाई, रुग्णसेवा, आरोग्य व्यवस्थेची चांगलीच काळजी घेतलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा चांगलाच फायदा होत असून, मुंढे येणार असल्याच्या दहशती ने का होईना रुग्णालय प्रशासन आता चांगलीच जागी झाली असल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.
सर्वच सुविधांवर झालाय परिणाम - तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीमुळे आरोग्य विभागात चांगला बदल झालेला पाहायला मिळाला आहे ज्या सरकारी रुग्णालयात औषध मिळत नव्हती बाहेरच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन देखील बंद झाले असुन औषधांसह रुग्णसेवा देखील सुधारली असल्याचे पाहायला मिळाले आहे.रुग्णालयात असलेल्या स्वच्छतेवर बारीक लक्ष दिल्यामुळे आता स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील जास्त काम करावे लागत आहे. एकूनच सर्वच सुविधांमध्ये चांगला बदल झालेला पाहायला मिळत आहे.